Thursday, 26 September 2019

गति,सद्गति,दुर्गतिअर्थात राजगति! – मंजुल भारद्वाज.



महात्मा गांधी म्हणजे फक्त इव्हेंट नाही. महात्मा गांधी हे भारतीय आणि वैश्विक राजनैतिक प्रक्रियेचा विवेक आहेत.विविधता आणि सर्वसमावेशकतेचे सत्य आधारित अहिंसा मुक्तिचा मार्ग आहेत.राजनीती म्हणजे केवळ सत्ता स्थापन करून तिचा उपभोग घेणे व शोषण करणे हे मिथक तोडून, राजनीतीला जनकल्याणाच्या रुपात प्रस्थापित करणाऱ्या विचारवंताचे नाव आहे 'गांधी'.वर्चस्ववादाच्या संकीर्णतेचे विष पिणारा, राजनैतिक प्रयोग आहे 'गांधी'.ज्या प्रयोगाच्या भूमीवर भारत देश श्वास घेतो. जवाहरलाल नेहरुंचे सार्वभौमत्व व बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपन्न राष्ट्र विश्वभरात आपली धमक दाखवत आहे. जो एका नवराष्ट्राला दोन ध्रुवीय विश्वात गुटनिरपेक्ष देशांना नेतृत्व करण्याची विवेकात्मक शक्ती देतो आहे.
 कॉंग्रेस सत्तेने गांधींना सरकारी कार्यक्रम व सरकारी योजनांच्या नामकरणां पुरते मर्यादित करून ठेवले आहे. गांधींचे प्रताप, नेहरूंची दृष्टी आणि आंबेडकरांची न्यायिक जाण आणि सामाजिक समतेच्या संविधानिक तरतुदींनी कॉंग्रेसला सत्तेत तर ठेवले, पण गांधींचा विचार मात्र संपत गेला. सत्ताधारी कॉंग्रेसला याची कल्पना ही नव्हती आणि 70 वर्षांत गांधींच्या विचारांवर गोडसेच्या विकाराने कब्जा केला. गोडसेची संतान आज मेंढरांच्या बहुमताने सत्तेवर विराजमान झाली आहे आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली संविधानाला उडवून लावत आहेत.
जागतिकीकरणाच्या बाजारात, सत्ताधारी गर्दीच्या खांद्यावर स्वार होऊन  गांधींच्या नावाने कार्यक्रम आणि मिरवणुका आयोजित करून स्वत: नेहरू बनण्यास उत्सुक आहेत, परंतु त्यांचे 'गोडसे' स्वरूप तितकेच महाकाय होऊन उदयास येते. राष्ट्रवादाच्या विळख्यात अडकलेल्या या गर्दीला त्यांचे गोडसे स्वरूप खूप आवडत आहे. एवढंच नाही तर यांच्या छायाचित्रांनी सजलेल्या साड्यां परिधान करून, महिलासुद्धा सोशल मीडियावर सेल्फी मोहिम चालवत आहेत. जगातील अत्यंत खोटे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या सोबत संयुक्त रैली करत आहेत. लोकशाहीला निवडणूकीच्या सर्कसमध्ये बदलविण्यात त्यांनी प्रभुत्व मिळवले आहे. बौद्धिक वर्ग तर यांच्या जुमलांच्या कार्यक्षमतेचे वर्णन संवादाचे प्रभुत्व म्हणून करत आहे, परंतु आत्महीनतेने ग्रासलेला सत्ताधारी प्रत्येक वेळी गरळ ओकत आहे आणि देशाच्या अस्मितेचे हनन करण्यात यशस्वी होताना दिसतो आहे.
 अशा वेळी केवळ गांधींचा राजनैतिक विवेकच भारताला वाचवू शकतो. आज देशवासीयांमध्ये राजनैतिक जाणीव जागृत करण्याची गरज आहे. देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा भ्रम तोडण्याची गरज आहे की लोकशाही म्हणजे निवडणुका हरणे आणि जिंकणे एवढंच नाही !
ही राजकीय जाणीव जागृत करण्यासाठी ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ चे प्रतिबद्ध रंगकर्मी "विचार, विविधता, विज्ञान, विवेक आणि संविधान संम्मत" राजनैतिक पिढी घडवण्याचा संकल्प करत 2 ऑक्टोबर, 2019 (बुधवारी सकाळी ११ वाजता) रोजी, शिवाजी नाट्य मंदिर, मुंबई येथे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित - दिग्दर्शित नाटक "राजगति" सादर करणार आहेत.
 नाटक : “राजगति” प्रस्तुती
 कधी : 02 ऑक्टोबर 2019, बुधवार सकाळी 11.00 वाजता.
कुठे : “शिवाजी नाट्य मंदिर”, दादर (पश्चिम), मुंबई
वेळ :120 मिनिटे
लेखक - दिग्दर्शक : रंगचिंतक मंजुल भारद्वाज.
कलाकार:अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के ,स्वाती वाघ  प्रियंका कांबळे, बेटसी अँड्र्यूस आणि सचिन गाडेकर.
नाटक 'राजगति' : नाटक "राजगति" सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र आणि राजनीती' ची गति आहे. राजनीति ला पवित्र नीति मानत आहे. राजनीति घाणेरडी आहे या भ्रमाला तोडून राजनीति मध्ये जन सहभागितेची मागणी करते. ‘माझे राजनीतीशी घेणं देणं काय' सामान्य जनतेच्या या अवधारणेला दिशा देते. सामान्य लोक लोकशाही चे पहारेकरी आहेत आणि पहारेकरी आहेत तर सामान्य जनतेचा सरळ सरळ राजनीतीशी संबंध आहे. नाटक 'राजगति' समता,न्याय,मानवता आणि संवैधानिक व्यवस्थेच्या निर्माणासाठी ‘राजनैतिक परिदृश्याला' बदलण्याची चेतना जागवते. ज्याने आत्महीनतेचा  भाव उध्वस्त होऊन ‘आत्मबळा' ने प्रेरित ‘राजनैतिक नेतृत्वा' चा निर्माण व्हावा.
नाटक “राजगति” का ?
 आपले आयुष्य  दर क्षणी 'राजनीती' ने प्रभावित आणि संचालित होत असते पण एक 'सभ्य' नागरिक असल्या कारणाने आपण केवळ आपल्या 'मताचे दान' करतो आणि आपल्या राजनैतीक भूमिकेपासून मुक्त होतो आणि मग दर वेळी राजनीतिला कोसत राहतो आणि आपली मनोभूमिका ठरवून टाकतो की, राजनीती 'वाईट' आहे... चिखल आहे.. आम्ही सभ्य आहोत, राजनीति आमचे काम नाही, जर जनता प्रामाणिक आहे तर त्या देशाची लोकतांत्रिक राजनैतिक व्यवस्था भ्रष्ट कशी होऊ शकते?....
चला जरा विचार करूया की राजनैतिक प्रक्रियेविना विश्वातील सगळ्यात मोठे लोकतंत्र चालू शकेल का... नाही चालणार... आणि जेव्हा ‘सभ्य’ नागरिक त्याला नाही चालवणार तर मग वाईट प्रवृत्तीचे लोक सत्ता चालवणार आणि तेच घडतं आहे... चला एक सेकंद विचार करूया, की खरंच राजनीती वाईट आहे की आपण त्यात सहभागी न होऊन त्याला वाईट बनवत आहोत?...
आपण सगळे अपेक्षा करतो की, 'गांधी, भगतसिंग, सावित्री आणि लक्ष्मी बाई’ या देशातच जन्माला यावे पण माझ्या घरात नाही …चला यावर मनन करू आणि ‘राजनैतिक व्यवस्थेला' शुद्ध आणि सार्थक' बनवू ! समता, न्याय, मानवता आणि संविधानिक व्यवस्था निर्माणासाठी 'राजनैतिक परिदृश्य' बदलण्याची चेतना जागवू, ज्याने आत्महीनतेचा भाव उध्वस्त होऊन 'आत्मबळाने' प्रेरीत 'राजनैतिक नैतृत्वाचा' निर्माण होईल .
 संपूर्ण जगात आता अवकळा पसरली आहे. जागतिकीकरणाच्या अफुने तर्काला नष्ट करून माणसाला आस्थेच्या पुढ्यात नेऊन ठेवले आहे. निर्मम आणि निर्लज्ज भांडवलशाही सत्ता मानवतेला पायाखाली चिरडत आहे. विकास पृथ्वीला गिळत आहे. विज्ञान तंत्राच्या बाजारात देहविक्री सम विकले जात आहे. भारतात याची उदाहरणे टोकावर आहेत आणि समजण्या पलीकडे आहेत. 'चमकी बुखार' (मस्तिष्क ज्वर) लहान मुलांच्या मृत्यूची सुनामी आणि चंद्रयानाची भरारी. दहा लाखाचे सूट आणि वस्त्रहीन समाज. लोकतंत्राच्या सुंदरतेला कुरूप करणारे गर्दीतंत्र आणि धनतंत्र. न्यायासाठी दारोदारी भटकणारा समाजातला खालचा वर्ग आणि आपल्या अस्तित्वासाठी लढणारे सुप्रीमकोर्ट. संविधानामूळे स्वतःचे पोट भरणारे कर्मचारी आज आपल्या कर्माने राजनेत्यांची लाथ खाण्यासाठी शापित आहेत. चौथी आर्थिक महासत्ता आणि बेरोजगारांची गर्दी. जेव्हा जेव्हा मानवाचे तंत्र असफल होते, तेव्हा तेव्हा अंधविश्वास आस्थेची चादर ओढून विक्राळ रूप धारण करत, समाजाला गुंडाळून घेतो. लंपट गर्दीच्या जोरावर सत्तेत येतात आणि मीडिया पीआरओ बनते. समाज एका ‘फ्रोजन स्टेट’ मध्ये जातो. ज्याला तोडण्यासाठी माणसाला आपल्या विकारांपासून मुक्तिसाठी ‘विचार आणि विवेकाला' जागवणे आवश्यक आहे. वैचारिकतेचे पेटंट ठेवणारे वामपंथी, जडत्व आणि प्रतिबद्धतेचा फरक नाही समजून घेत. त्यांच्यावर केलेली टीका समजून न घेता थेट प्रतिक्रिया व्यक्त करतात.  गांधीचा राजनैतिक विवेकशील वारसा मातीत मिळाला आहे.

अशा वेळी  समाजाच्या ‘फ्रोजन स्टेट’ ला तोडण्यासाठी कलाकारांनी विवेकाच्या मातीत विचारांचे रोपटे लावणे आवश्यक आहे. समाजाच्या 'फ्रोझन स्टेट' ला तोडण्यासाठी "थिएटर ऑफ रेलेवन्स" आपल्या कलात्मकतेने विवेकाच्या मातीत विचाराचे रोप लावण्‍यासाठी प्रतिबद्ध आहे.
लेखक - दिग्दर्शक 
"थिएटर ऑफ रेलेवेंस” नाट्य सिद्धांताचे सृजक आणि प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज असे रंगचिंतक आणि रंग आंदोलक आहेत, जे राष्ट्रीय आव्हानांना फक्त स्विकारत नाहीत तर आपला रंग विचार "थिएटर ऑफ रेलेवेंस" च्या माध्यमातून ते राष्ट्रीय उदिष्ट जन-माणसांसमोर ठेवतात. ह्या अभिजात लेखक - दिग्दर्शकाने आजतागायत 28 पेक्षा अधिक नाटकांचे लेखन दिग्दर्शन केले आहे. तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर थियेटर ऑफ रेलेवेंस सिद्धांताच्या माध्यमातून 1000 पेक्षा अधिक नाट्यकार्यशाळांचे संचालन केले आहे.
प्रेक्षक सहयोग आणि प्रेक्षक सहभागीतेने आयोजित या प्रस्तुती मध्ये आपल्या सक्रिय सहयोग आणि सहभागितेची अपेक्षा!

विस्तृत माहिती साठी संपर्क
9820391859/etftor@gmail.com
#2ऑक्टोबर #गांधी #नाटकराजगति #शिवाजीमंदिर #मंजुलभारद्वाज