Tuesday, 5 June 2018

“थिएटर ऑफ़ रेलेवंस" च्या २५ वर्षीय नाट्योत्सवाने सजणार महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ‘पूणे’!

“थिएटर ऑफ़ रेलेवंस" च्या २५ वर्षीय नाट्योत्सवाने सजणार  महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ‘पूणे’! -
“थिएटर ऑफ़ रेलेवंस" नाट्य दर्शनाचे २५ वर्ष
3 दिवसीय पूणे नाट्योत्सव
6,7,8 जून,2018
टिळक स्मारक नाट्य मंदिर, पुणे

देशाला ‘स्वराज्य’ आणि ‘समते’ चा विचार देणारी पुण्याची ऐतिहासिक भूमी आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ‘पुणे’ येथे ६,७,८ जून २०१८ रोजी ‘टिळक स्मारक नाट्यमंदिर’ येथे सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होणार ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ नाट्य दर्शनाचा २५ वर्षीय नाट्य उत्सव!
१० ऑगस्ट, २०१७ रोजी दिल्ली पासून सुरू झाला “थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य उत्सव, मुंबई, पनवेल, ठाणे येथे प्रत्येक रंग संभावनेला अंकुरित करत आता पुण्यातील ऐतिहासिक भूमी वर ६,७,८ जून २०१८ रोजी ‘टिळक स्मारक, नाट्य मंदिर येथे होणार आहे. प्रत्येक रंगकर्मीला प्रोत्साहित करणारे रंग आंदोलन आहे “थिएटर ऑफ रेलेवन्स” …. २५ वर्षांपासून सतत सरकारी, नीम सरकारी, कॉर्पोरेटफंडिंग किंवा कोणत्याही देशी विदेशी अनुदाना पासून मुक्त. सरकारच्या ३०० ते १००० करोड च्या अनुमानित संस्कृति संवर्धन बजेट च्या विरुद्ध 'प्रेक्षक' सहभागितेने उभे आहे आमचे रंग आंदोलन ... मुंबई पासून मणिपूर पर्यंत!
“थिएटर ऑफ़ रेलेवंस” ने जीवनाला नाटकाशी जोडून रंग चेतनेचा उदय करून त्याला लोकांशी जोडले आहे. आपल्या नाट्य कार्यशाळेत सहभागींना मंच, नाटक  आणि जीवनाचा संबंध, नाट्यलेखन, अभिनय, दिग्दर्शन, समीक्षा, नेपथ्य, रंगशिल्प, रंगभूषा आदि विभिन्न रंग पैलूंवर प्रशिक्षित केले आहे आणि कलात्मक क्षमतेला दैवी वरदानापासून बाजूला सारून वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या दिशेला वळवले आहे. 25 वर्षांत 16 हजाराहून अधिक रंगकर्मींनी 1000 कार्यशाळांमध्ये भाग घेतला. जिथे भांडवलदारी  कलाकार कधीही आपली कलात्मक सामाजिक जबाबदारी घेत नाहीत, म्हणूनच "कलेसाठी कला" या चक्रव्यूहात फसून आहेत आणि भोगवादी कलेच्या जात्यात दळण दळून संपत चालले आहेत.
“थिएटर ऑफ़ रेलेवंस” ने “कलेसाठी कला” यांसारख्या औपचारिक आणि भांडवलवादी विचारांच्या चक्रव्यूहाला आपल्या तत्व आणि सार्थक प्रयोगांनी तोडले आहे आणि हजारों रंग संकल्पनांना रोवले आणि अभिव्यक्त केले आहे. आता पर्यंत 28 नाटकांचे 16,000 हून जास्त वेळा प्रयोग, सादरीकरण झाले आहे.
जागतिकीकरण भांडवलवादी सत्तेच्या ‘विचाराला’ कुंद, खंडित आणि नष्ट करण्याचे षडयंत्र आहे. तंत्रज्ञानाच्या रथावर स्वार होऊन विज्ञानाच्या मूळ संकल्पनांच्या विनाशाचे हे षडयंत्र आहे.
विकासाच्या नावाखाली पृथ्वी आणि पर्यावरणाचा विनाश, प्रगतशीलतेला केवळ सुविधा आणि उपभोगामधे रूपांतरित करण्याचा हा खेळ.
फॅसिस्ट ताकदीचा बोलबाला आहे, “जागतिकीकरण”! लोकतंत्र, लोकतांत्रीकीकरणाच्या वैधानिक परंपरांचा अवमान आहे “जागतिकीकरण”! अशा भयावह स्थितीत माणसाचे माणूस बनून राहणे हे एक आव्हान आहे.... या आव्हानापुढे उभे आहे “थिएटर ऑफ़ रेलेवंस’ नाट्य दर्शन, गेल्या 25 वर्षांपासून फॅसिस्टवादी ताकदिंशी झगडत!
जागतिकीकरण आणि फॅसिस्टवादी शक्ती ‘स्वराज्य आणि समता’ या विचारांना उद्धवस्त करून समाजात विकार निर्माण करतात ज्याने संपूर्ण समाज ‘आत्महीनतेने’ ग्रासित होऊन हिंसक होऊन जातो. हिंसा मानवतेला नष्ट करते आणि कला मनुष्यात ‘माणुसकीचा’ भाव जागृत करते.  कला जी माणसाला माणुसकीचा बोध देते… कला ती जी माणसाला माणूस बनवते ! याच सांस्कृतिक चेतनेला पुढे घेऊन जात ६,७,८ जून रोजी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ‘पुणे’ येथे होणार ३ दिवसीय “थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य उत्सव!

प्रेक्षक सहयोग आणि सहभागितेने आयोजित या उत्सवात प्रस्तुत होणार आहेत रंग चिंतक मंजुल भारद्वाज द्वारे रचित तीन क्लासिक नाट्य प्रस्तुती
1. आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात मनुष्य रुपी देहांत 'माणुसकीला' शोधणारे नाटक “गर्भ”
2. खरेदी आणि विक्री च्या काळात कलाकारांना वस्तुकरणातून उन्मुक्त करणारे नाटक
“अनहद नाद –Unheard Sounds of Universe”
आणि अर्ध्या लोकसंख्येचा आवाज. पितृसत्तात्मक व्यवस्थेच्या शोषणा विरुद्ध हुंकार, न्याय आणि समतेची गाज, नाटक आहे, “न्याय के भंवर में भंवरी”! या कलात्मक मिशनाला आपल्या कलेने मंचावर साकार करणारे कलाकार आहेत, अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर,तुषार म्हस्के आणि बबली रावत!
आपला सक्रिय सहयोग आणि सहभाग अपेक्षित!
“थिएटर ऑफ़ रेलेवंस" च्या २५ वर्षीय पुणे नाट्योत्सवात काळाला गढणारी प्रसिद्ध नाटके “गर्भ” आणि “अनहद नाद –अनहर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स”  आणि “न्याय के भंवर में भंवरी” ६,७,८ जून २०१८ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘टिळक स्मारक नाट्य मन्दिर’ येथे सजणार महाराष्ट्राची
सांस्कृतिक राजधानी ‘पूणे’!

Contact : 9820391859 / email :
etftor@gmail.com
Manjul Bharadwaj