Tuesday, 9 August 2016

नवा यलगार क्रमश :1

माझ्यासाठी short film बनवन हा अनुभव नवीन नव्हता ….हो फक्त त्याला आता दिशा मिळाली ….आणि जाणीव पूर्वक करत असल्याची जान झाली….थियेटर ऑफ़ रिलेवन्स नाट्य सिद्धांत प्रकियेमधे ….सिंधुदुर्ग ला “ संघर्ष शेतकर्यांच् “ हे छत्रपति शिवाजी कृषि विद्यापीठ मधील मुलांबरोबर नाटक करत असताना संघर्षा मध्ये असणारा शेतकरी जानवला आणि त्यानंतर मनामध्ये प्रश्न निर्माण झाले 




….आणि शेतकऱ्यांच्या सध्याच्या ….बेबसी , बेचारी, आणि गरीबी सारखी दिसनारी अवस्था जानवली आणि त्याचा महत्वाच् कारण समझल की, शेतकरी हा आपल्या मालचा दर ठरवत नाही तो दलाल ठरवतो ….आणि शेतकरी फक्त नावाला राजा आहे परिस्थिति मात्र उलटी आहे ….खुप दिवस झाले मनात चैन पड़त नव्हते ….हां विषय कसा मांडायचा याच्याच् विचारात होतो ….दुसऱ्या बाजूला होत असणारी धावपळ त्यामुळे या विषयाच मंथन मनामध्ये सुरु होतच …..सुरुवात कशी करायची हा प्रश्न ...त्यातून मनात विचार आला गावी जाउन मूलांचे वर्क शॉप घेऊन हा विषय मांडू यात पण त्यात मी काही ठाम होत नव्हतो….शेवटी short film बनवन्याची संकल्पना डोळ्यासमोर निर्माण झाली ….आणि विषयाला मांडायला सुरुवात केली….आता शॉर्टफिल्म बनवनार तर टीम हवी आहे ...कस करायच ? काय करायच ? हे मला काही माहिती नव्हते ….गावी जाउन विषय पोहचवन्यासाठी short film चा सहारा घेतला … सहजच गावी गेलो ….पाहिल तर कोणाचा रिस्पॉन्स नव्हता मग पुन्हा मुम्बई ला आलो मग फोन वरुण संपर्क साधायला सुरुवात केली एक एक धागा जोड़त पुढे जायच ….नाशिक च वर्कशॉप संपल तसाच 31 तारखेला ठाणे ला गेलो ….तिकडे संकल्पना ऐकवली आणि दुसऱ्या दिवशी bag उचलून गावी ….दरम्यान संकेत बरोबर बोलन केल होत त्या अगोदर ….थेट गावामध्ये जाउन लोकेशन बघायला सुरुवात केली ….मग, बोलताना संकेत ला सांगितल गावची मीटिंग घेऊन हा विषय मांडायचा आहे ….संकेत ने मीटिंग ची सुचना ठराविक लोकांपर्यन्त पोहचावली त्यामध्ये अंदाजे 70 ते 80 गावामधली माणसे आली होती ….मीटिंग ला जाण्या अगोदर आपले मुद्दे वहिवर मांडले काय काय बोलायच आहे ते लिहील ...कारण , माझ्यासाठी आपल्याच गावातील मानसांसमोर बोलन थोड़ कठीन होत त्यामुळे थोड़ी दूर अवस्था चेहऱ्या वर झाली होती ….संकेत ला ते थोडा फार जानवल आणि जेवताना तो बोलला एवढं काय टेंशन घेतोय करतील लोक मदत ….त्याच वेळी जानवल आता मला ज़रा लीडर सारख रहावे लागणार आहे 




….एकदम खंबीर , निर्णयशील , आणि विचारशील … जेवण झाल्यावर उठलो आणि ताबडतोब जाउन कपडे chenge केले …. आणि मी तयार झालो …कपडे बदलले आणि विचारही आपोआप बदलले होते त्यामुळे अचानक तेजस्वी जानवायला लागले होते….मीटिंग ची वेळ 9 वाजता ठरलेली होती …..1 जून 2016 रात्री 9 वाजता ….गाव माटवन , तालुका पोलादपुर , जिल्हा रायगड ….माझ्या मनात क्रांती निर्माण करणारी मीटिंग ठरली ….आर आणि पार च्या या लढाईत विचारांच् मंथन होत होत ….संकेत ची प्रस्तावना करुण झाल्यानंतर त्याने ही सभा माझ्या हातात दिली ….लघुपटाची संकल्पना सांगितली आणि सध्याची शेतकार्यांची बाजू सांगीतल्यावर … थोड़ा वेळ सर्व जन शांत होते ….नंतर बोललो शेतकरी आपल्या मालाला दर ठरवत नाही यावर तुम्हाला काय वाटत ? अस विचारल्यावर काही वेळ मीटिंग शांत नंतर प्रत्येक जन बोलायला लागला आणि त्यांच्याकडून उत्तरे येत होती ...कस शक्य आहे ? आमच्याने होणार नाही ? हां आपला अधिकार नाही ….आणि माझे डोळे चमकू लागले कारण शार्टफ़िल्म मधला हा सीन डोळ्यासमोर दिसत होता ...मग , सांगितला की आपल्या आन्दोलनाचा प्रकार वेगळा आहे आपण आंदोलनाला न जाता बदल घडवून आनण्यासाठी ही शार्ट फ़िल्म बनवत आहोत…..आणि सर्व जन ताबडतोब तयार झाले होते….लगेच लगेच त्यांची उत्तर येत होती आमच्याकडून काय काय अपेक्षित आहे बोललो मला दोन सीन मध्ये तुम्ही सर्वं जन हवी आहेत ...आणि तुमच सहकार्य ….आता सर्वजन शूटिंग बोलल्या नंतर कुतूहल आणि आनंदी होतेच ...मग , शेवटी मी माझा आर्टिकल वाचला जो शेतकर्यांवर लिहिला आहे तो आणि तो वाचत असताना प्रत्येक जन शांत ….त्या हनुमानाच्या मंदिरात एकदम शांतता पसरलेली ….प्रत्येक जन आज जागा झालेला दिसला ...आज माझ गाव हे राजकीय विषयावर बसून चर्चा करत असताना दिसत आहे हे जाणवू लागले वा ! क्या बात है ….आणि माझ्या गावच्या मानसांची एक ख़ास गोष्ट आहे विषय गावाच्या लेवल चा असतो त्यावेळी तो विषय सर्व जन उचलून धरत असतात ….त्या आर्टिकल च्या वाचन झाल्या नंतर आलेल्या प्रतिक्रिया या खूप अनोख्या होत्या त्या म्हणजे ...अंगात रक्त सलसलत होत आणि आत मध्ये आग लागली होती….ही ऊर्जा घेऊन मी पुन्हा मुम्बई मध्ये आलो…..
तुषार राजेश्री तानाजी म्हस्के 

नवा यलगार 
क्रमश :1