Monday 19 February 2018

निसर्गातील वेगवेगळ्या रंगछटा रंगवणारी हि कार्यशाळा ..तुषार म्हस्के


जीवनात जगलेले अनुभव साध्य रूपाने नेहमीच बरोबर असतात.... जगलेल्या क्षणांचे मनन व चिंतन करत येणाऱ्या , भविष्यातील क्षणांना स्वतःच्या हाताने बनवण्यासाठी लागणारी दृष्टी थिएटर ऑफ रेलेवन्स सातत्त्याने मला देत आहे...


युद्ध भूमीवर सैनिक नियोजन करून जातात व  योग्य नियोजनाने युद्ध जिंकतात... जिंकलेले युद्ध , त्यात  मिळालेले यश टिकवून ठेवणे व नवीन नियोजन करणे.. हे खूप महत्वाचे होऊन जाते..हे योग्य नियोजन व त्याची कृती नाही केलीं तर जिंकलेले युद्ध आपण कधीही हारु शकतो .जिंकलेल्या क्षणांना एकत्र घेऊन ते क्षण कसे टिकवायचे,  त्याच बरोबर तो जिंकलेल्या अनुभवांचा साठा एकत्र घेऊन जाण्याची पद्धत , प्रक्रिया,  थिएटर ऑफ रेलेवन्स च्या  26 ते 30जानेवारी 2018 ला युसूफ मेहरअली सेंटर ,तारा,पनवेल येथे झालेल्या कार्यशाळेत मला अनुभवायला मिळाले...
या कार्यशाळेचे उत्प्रेरक रंगचिंतक मंजुल भारद्वाज..



व्यक्तीच्या अंतर्मनात सुरु होणारी प्रक्रिया व्यक्तीला बदलाच्या दिशेने घेऊन जाते... थियेटर ऑफ रेलेवंस एक प्रयोग शाळा आहे .. ही प्रयोगशाळा , व्यक्तीच्या अंतर्मनात घडत असणाऱ्या गोष्टीना सकारात्मक बदलाच्या दिशेने घेऊन जाते.. मनामध्ये तयार होणारे नकारात्मक विचारांचे बांध तोडून त्यांना सार्थक दिशा देण्याचे कार्य होते.
जीवन जगत असताना , अनुभवाची एक – एक पायरी चढत असताना , येणारे अनुभव व्यक्तीच्या व्यक्तीमत्वामध्ये गुणांची वाढ करत असते. जगत असताना  मिळालेले क्षण टप्याटप्याने अनुभवणे , व त्या गुणांना समजून ते व्यक्तीच्या आत नव्याने अंगीकारणे म्हणजेच व्यक्तीची व्यापकता ही  वाढत असते . थियेटर ऑफ रेलेवंस २५ वर्ष पूर्तीचा सोहळा पनवेल मध्ये १८, १९, २० डिसेंबर २०१७ ला पार पडला. ह्या अनुभवामध्ये आम्हा पाचही कलाकारांमध्ये वेगळीच सकारात्मक उर्जा आणि जग जिंकण्याच सामर्थ्य निर्माण झालेले . २१डिसेंबर २०१७  पासून ते २५जानेवारी २०१८  पर्यंतचा 36 दिवसांचा सर्वात मोठा अवधी निघून गेला होता. कार्यशाळेची सुरुवात हि , या जिंकलेल्या अनुभवाला पुन्हा अंगीकारण्या पासून झाली .



जसं  प्रेक्षकांनी नाटक पाहिल्यानंतर दिलेल्या अनुभवाच्या प्रतिक्रिया / प्रतिसाद पेपर वर लिहिण्यात आल्या. तो अनुभव मांडल्यानंतर समजले ... आपली एक वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे व आता  ही ओळख टिकवून ठेवणे  आपली नैतिक जबाबदारी आहे . मग , ते अनुभव टिकवण्यासाठी मी काय करतोय ? मी ते अनुभव लिहित  आहे का ? लिहिलेलं मी आत्मसात करत आहे का ? त्या पहिल्या दिवसाच्या प्रक्रियेमध्ये मला हे जाणवू लागले की.. अनुभवांना पुन्हा आत्मसात करण्याची प्रक्रिया माझ्या मध्ये  निर्माण होत आहे , त्याच क्षणी हवेची निर्मळ  झुळूक मला  स्पर्श करून गेली. ह्या अनुभवाला टिकवून ठेवण्यासाठी मी काय करतोय ? ... तर ह्या जगलेल्या क्षणाला लिहून माझ्या सोबत ठेवतोय ... २६ कमवलेले गुण घेऊन ज्यावेळी मी माझ्याकडे पाहिले  , त्यावेळी मला असे जाणवलं की प्रत्येक क्षणी हे गुण घेऊन मी चालत आहे . बघता क्षणी  आपोआप माझी चालण्याची पद्धत बदलली ,  छाती काही क्षणांसाठी फुगलेली जाणवली. असं वाटू लागले , हा क्षण मी माझ्या हृदयाच्या कप्यात साठवून ठेवावा. कारण,हा क्षण खूप जवळचा वाटू लागला...अनुभवांची शिदोरी जी माझ्याकडे आहे ती कधीही  न संपणारी आहे. तोच हा क्षण आहे जो सतत माझ्या मनात समाधानाची विशाल लाट निर्माण करतो. मनामध्ये साचलेले खाली पण निघून गेले , व त्यात समाधानाच धन वाढू लागले.
ह्या कार्यशाळेचं  वैशिष्ट्य म्हणजे सातत्याने अनुभव येतात व ते नवीन कलागुणांना जन्म देतात ...अश्यावेळी आपल्या सोबत असणाऱ्या या कलागुणांना सांभाळण्यासाठी काय काय करायला हवं , त्याची अलौकिक प्रक्रिया ह्या कार्यशाळेत झाली.
अगदी सकाळी उठल्यापासून ....ज्यावेळी आपण सकारात्मक मानसिकता घेऊन येतो त्यावेळी नक्की आपण कुठे असतो ? त्याचे सुंदर चित्र मंजुल भारद्वाज सरांनी दाखवले. सकाळी उठल्यानंतर सहभागी साथी ज्यावेळी नियोजित ठिकाणी यायचे ते कशा पद्धतीने यायचे ... हे डोळ्यासमोर दिसून येत होते. आदल्या दिवशी घेतलेले अनुभव ..ज्यावेळी आपण  रात्री झोपतो त्यावेळी त्या अनुभवानां सोबत घेऊन झोपतो कि, तो अनुभव विसरून जातो ? याच प्रात्यक्षिक हे सकाळी मिळाले ...सकाळी उठल्यानंतर आम्ही नियोजित ठिकाणी भेटण्याचे ठरले त्यावेळी , येणारा सहभागी हा ज्या मानसिक्तेमधून येत होता.. त्यानुसार त्याचे शरीर बोलत होते. कोण उत्साही होता. तर , कोणी आनंदित , कोणी शरिराचा ओझ घेऊन, कोणी आदल्या दिवशी जगलेल्या अनुभवाचं मनन , तर कोणी कधीही तयार आकाशात उंच उडण्यासाठी , नवीन विचारांच्या शोधात..
या एका प्रक्रियेवरून समजलं व्यक्तीच माइंड maping म्हणजे काय ? ... व्यक्ती कोणत्या भूमीवरून येत आहे.. आपल्या बरोबर संवाद करत आहे ते एका क्रियेटरने समझने गरजेच आहे... ह्याच बरोबर मंजुल सरांनी एक सूत्र हातात दिले ..".की हीच ती वेळ असते जेव्हा एका लीडर ने जबाबदारी घेऊन प्रक्रियेला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांना एकाच धरातल वर घेऊन येणे. " ह्या प्रक्रियेमुळे मला समजले व्यक्ती ज्यावेळी माझ्यासमोर येत आहे तो नक्की काय विचार करतोय ? तो नक्की कोणत्या ठिकाणी आहे .? त्याच्याबरोबर मी कशा पद्धतीने जोडला जाईलं याचे सूत्र मला मिळाले. कार्यशाळा संपल्यानंतरही आता मी व्यवहारिक जगामध्ये वावरत आहे त्यावेळी मला लगेच समजत आहे .. कि , ह्या व्यक्तीची नक्की मानसिकता काय आहे. ? आणि मला त्याच्याबरोबर काय बोलायचं आहे .. मला माझी बाजू समजावून सांगण्यासाठी काय करायचं आहे  ....हे समझले आहे.
व्यक्ती समूहामध्ये सर्कल मध्ये बसून एक अजेंडा केंद्र स्थानी घेऊन ज्यावेळी काम करत असतो,  त्यावेळी त्याची ऊर्जा, समूहाची ऊर्जा केंद्रस्थानी येऊन ती परावर्तीत होत एकमेकांना प्रेरणा देत असते. समूहाच्या ऊर्जा ही एका  ध्येयाच्या द्र्ष्टीने काम करत असते. रात्री समूहामध्ये चर्चा करत असताना आम्ही एका ऊर्जेमध्ये एकत्र बसून , एक ध्येय ठेऊन काम करत होतोे. झोपायला गेलो . त्यावेळी स्ट्रक्चर हे बदललेले होते, आणि त्याचा थेट परिणाम असा  झाला कि आम्ही एक अजेंडा घेऊन करणार होतो ते काम झाले नाही. प्रत्येक जन त्याच्या व्यक्तिगत कामामध्ये गुंग होऊन गेला. प्रत्येक जन वेगवेगळ्या बेड वर असल्यामुळे जी समुहाची असणारी ऊर्जा विभागली गेली. त्याच बरोबर एक विषय केंद्रस्थानी ठेवून आम्ही जो विषय अजेंडा म्हणून घेणार होतो तो झालाच नाही. त्याच बरोबर एक गोष्ट लक्षात आली की , विषय केंद्रस्थानी असणं हा एक मुद्दा आहे . त्या विषयाला लीड करून पुढे घेऊन जाण्यासाठी जबाबदारी घेणं गरजेचं आहे. त्याच बरोबर घेतलेली जबाबदारी पूर्ण करणे हे ही तेवढेच महत्त्वाचे आहे. स्ट्रक्चर नुसार झालेले विभाजन व्यक्ती ला स्वतः पर्यंत केंद्रित करतात . हे ही त्यावेळी समजले. मग, असं लक्षात आले की ,आपल्या भारतीय संस्कृती मध्ये समूहाला विशेष महत्व दिले जायचे. मग, समूहाने बसून चर्चा करणे ,एकत्र बसून जेवणे. घराची रचना ही त्याच प्रमाणे असायची . इंग्रज आले त्यांनी त्यांची व्यवस्था निर्माण करण्यासाठी वास्तू मध्ये विशेष बदल केले बसण्याच्या व्यवस्थे मध्ये बदल केले. जसं, उदाहरण म्हणून पाहिले की लक्षात येईल. आताची शिक्षण व्यवस्था ..समोर असणारा शिक्षक उभा राहून शिकवत असतो.बाकीचे रांगेत बसून ऐकत असतात. त्यांना समजत ही नाही शिकवणारा काय शिकवत आहे . एका बाजूला कळतही असेल. पण ,जो शिक्षक समजवत असतो त्याच्या मध्ये फक्त ordered देण्याचा भाव निर्माण झालेला असतो. अशा पद्धतीमध्ये रचनेमध्ये बदल करण्यात आले. ज्यामुळे व्यक्ती हा स्ट्रक्चर ने तुटला गेला. ह्या छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी.... थिएटर ऑफ रेलेवन्स च्या कार्यशाळेमुळे समजायला लागल्या. त्यामुळे समूह आणि उर्जेला कशापद्धतीने टिकवून ठेवता येईल हे समजले.

प्रत्येक व्यक्ती मध्ये अफलातून ऊर्जा असते. जीवनातील ध्येयाला साध्य करण्यासाठी त्याच्यासाठी योग्य नियोजन आणि ते ध्येय पूर्ण करण्याचा लागलेला ध्यास ...व्यक्तीला त्याच्या ध्येया पर्यंत घेऊन जाते. जीवनात जगताना ध्येय ठरवणे खूप महत्वाचे आहे. ते ध्येय नक्की काय आहे. हे हि समजून घेण म्हत्वाच आहे . ह्या कार्यशाळेत आमच्या बरोबर नवीन साथी होती. व्यक्तीची असणारी ध्येयासाठी तळमळ आणि काम करण्याची अफलातून जिद्द .. नवीन संकल्पना समजून घेणे .. असे विशेष गुण त्या व्यक्ती मध्ये दिसले. त्या व्यक्तीच्या ऊर्जेला नवीन ध्येय थियेटर ऑफ रेलेवंस ने मिळवून दिले. ब्रोड-वे ला जाण्याचे . त्यासाठी केलेला संकल्प . आपल्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो याच नियोजन याचा आराखडा . एका व्यक्ती पासून असणारी सुरू होणारी जर्नी व  त्याची वैश्विक  व्यापकता ह्या गोष्टी एकत्र दिसू लागल्या . थियेटर ऑफ रेलेवन्स हे व्यक्तीला ध्येय देते . ज्यामुळे त्या व्यक्तीची त्याच्या अस्तित्वाची एक उंच आणि वेगळीच ओळख निर्माण होते .. ह्या विश्वव्यापी ध्येयामुळे एक सकारात्मक वैश्विक बदलाची चाहूल माझ्या मनाला त्या क्षणाला जाणवू लागली.

ह्या कार्यशाळेच अजून एक  वैशिष्ट्य म्हणजे ,  आपल्या बरोबर असणारा साथी , सहसंवादी ह्याला आपल्या कडून काय अपेक्षित आहे हे खूप महत्वाचे आहे. त्याच्या गरजेनुसार त्या व्यक्ती ला तेवढे देणे. त्याच्यापेक्षा जास्त दिल्याने जास्त ओवरडोस होऊन साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते. ही महत्वपूर्ण  प्रक्रिया मला समझली.
वैज्ञानिक किती सतर्क असतो ज्यावेळी तो त्या वेगवेगळ्या रसायनांना एकत्र मिक्स करून नवीन पदार्थ बनवत असतो. त्याला हे माहिती असत मला हे काय बनवायचं आहे. त्याचे होणारे फायदे आणि तोटे याची जाणीव त्या व्यक्तीला माहिती असते. त्याच्यासाठी जो जाणीवपूर्वक एक – एक पदार्थ त्या मिश्रणा मध्ये टाकत असतो. त्याचं बरोबर येणारा result पाहण्यासाठी तो निरीक्षण करत असतो.मला ह्या कार्यशाळेत माझ्यातील संवेदनांची  जाणीव झाली कि , नक्की मी काय करतोय ...माझ्या बरोबर नेहमीच सुरु असलेली मानवी प्रयोगशाळा त्याची जबाबदारी नक्की मी घेतोय का ? ... नक्की मी जे वागतोय , करतोय त्या रसायनांचा होणारा प्रभाव नक्की काय आहे ... ह्याची एक उत्प्रेरकाच्या भूमिकेत जबाबदारी मी घेतोय का ? असे असंख्य प्रश्न त्या वेळी माझ्या मनात निर्माण झाले . व यातून मला हे जाणवलं कि, मला या  पुढे जगत असताना वागत असताना नक्की काय करायचं आहे व कसं जगायचं आहे ..
अशा निसर्गातील वेगवेगळ्या रंगछटा रंगवणारी हि कार्यशाळा ...ज्यामुळे जाणीव झाली , मला माझ्यातील ...निर्माण झालेल्या गुणांची ...जिथे जाणीव झाली मानवाच्या आत सुरु असणाऱ्या विचारांची ... जिथे मार्ग आहे  नवीन ओळख निर्माण करण्याचा ...जिथे संकलित होतात  माझ्यातील कलागुण ... माझ्या संवेदना ... नवीन परिघातील प्रवेश ... व्यक्तीच्या विचारांच्या समुद्रातील खोली ...त्याचं बरोबर उंच शिखरावरील उंच क्षण ... असे हे क्षण ज्या ठिकाणी करत असतो.. फक्त साधना ... साधना हि माझ्या व्यक्तित्वाला निर्मळ  करण्याची ... साधना हि माझ्यातील कलाकाराला ध्येयाने सार्थक काम करण्याची ... आपल्या विचारांच्या महासागरातून एक –एक मोत्यांचा कलागुण अर्जन करण्याची ....

थियेटर ऑफ रेलेवंस कार्यशाळा , युसुफ मेहरअली सेंटर , पनवेल
दिनांक २६ ते ३० जानेवारी २०१८

रंगकर्मी 
तुषार म्हस्के

No comments:

Post a Comment