Sunday 4 February 2018

शासनाने असा त्रास द्यायचा ... अशी व्यवस्था निर्माण करायची की त्याचा सामान्य माणसाला काही उपयोगच होणार नाही..तुषार म्हस्के


सकाळची धावपळ ट्रेन ...पकडण्याची तयारी ...प्लॅटफॉर्म वर असणारी गर्दी ...पब्लिक ब्रिज वरून पाहिलं तर मुंग्यांसारखी दिसणारी गर्दी आणि त्या गर्दी मध्ये श्वास घ्यायला ही जागा नाही ... धावत - पळत गर्दी मध्ये घुसायचं आणि ट्रेन पकडायची ...काय करणार ... सामान्य थकलेला माणूस ...हातात सत्ता असूनही ... कधीही सत्तेला प्रश्न विचारत नाहीत..."भोग आलिया भोगाशी भोगलेच पाहिजे " अशी असणारी मानसिकता ...
सकाळची वेळ गर्दी आणि त्या गर्दी मध्ये एकमेकांना धक्का बुक्की करत एकदाची ट्रेन पकडायची ...ट्रेन मध्ये उभं रहायला जागा मिळणे कठीण ... एकमेकांच्या पायावर पाय देत उभं राहणं ... बसायला मिळणे म्हणजे नशीबच बोलायचं ... चांगलं झालं तरी नशीब आणि नाही झालं तरी नशीब... त्यात सामान्य माणूस विसरून जातो ... इथे नशिबाचा संदर्भ असा काहीच नाही आहे ... हा प्रश्न व्यवस्थेचा आहे...शासनाचा आहे ... पण, बोलणार कोण ?हा पडलेला प्रश्न ...
आजचा प्रवास ह्याच गर्दीतून करत मी मालाड पासून दादर पर्यंत पोहोचलो... ट्रेन मध्ये उतरताना आजिबात कष्ट न घेता आपोआप मागे असणाऱ्या गर्दीने धक्का द्यायचा त्यानुसार एका झटक्यात ट्रेन मधून बाहेर पडायचो... 

ट्रेन मधून उतरल्यावर पाहिलं तर " बंद काचा चकमकीत लोकल ट्रेन .. सम्पूर्ण Air - Condition प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून जायला निघालेली बोरिवलीच्या दिशेने...platform वर असणारी गर्दी तशीच...ब्रिज वरून पाहिलं तर श्वास घ्यायला जागा नाही ...ट्रेन प्लॅटफॉर्म वर येते आणि पाहतो तर काय ? ... दरवाजे आपोआप उघडतात.. ट्रेन मधून एकात दुसरा माणूस बाहेर पडतो ... पुन्हा ट्रेन चे दरवाजे बंद होतात ... एकही माणूस चढत नाही ... ट्रेन पुन्हा निघून जाते...त्या ठिकाणी असणारी गर्दी एक तीळ मात्र हालत नाही. विकास बघायचा तर हा बघा ...
शासनाने असा त्रास द्यायचा ... अशी व्यवस्था निर्माण करायची की त्याचा सामान्य माणसाला काही उपयोगच होणार नाही... एक मात्र उद्देश " विकास " फक्त जगाला दाखवणे .. मात्र व्यवहारात विकास आजिबात दिसत नाही...विकासाचा बट्ट्याबोळ झालेली अशीही व्यवस्था ...काय कामाची ...ज्याठिकाणी विकास करायचा आहे ते सोडून नको तिकडे पैसे लावणे ...सध्याची AC लोकल ची असणारी अवस्था म्हणजे सफेद हत्ती पोसण्यासारखे आहे ...तरीही विकास ...

अपेक्षा आहे सामान्य माणूस लिहिलेल्या गोष्टी समजून घेईल आणि आपली संविधानिक भुमीका व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची बजावेल...

रंगकर्मी
तुषार म्हस्के

No comments:

Post a Comment