Tuesday 6 February 2018

मी एक कलाकार आहे त्याच बरोबर भारताचा एक संवेदनशील नागरिक आहे. ....तुषार म्हस्के


आज ओळख देतो मला हा रस्ता ...चालताना आपलंसं वाटणारा...चालत असताना ... सुंदर वेगळीच ऊर्जा जी सतत या रस्त्यावरून चालताना मला जाणवतेय ... हवेची ताजगी माझ्या शरीरात संचार करते. त्यातच जाणीव मला माझ्या अस्तित्वाची होते. आज पर्वा कोणाची नाही . विश्वास वाढत चाललाय माझ्या विचारांवर....पदोपदी व्यवहारिक जीवन मला challenge करतोय. येणार आवाहन " मी " सहजतेने स्वीकारतोय ...विश्वास वाढत आहे स्वतः वर विचार करण्याचा आणि त्या विचारांना प्रत्यक्षात अनुभवण्याचा...  " थिएटर ऑफ रेलेवन्स राजनैतिक चिंतन रैली " काढण्याचा विचार मनात आला आणि तो विचार जनमानसात पोहचवण्यासाठी केलेला ध्यास..प्रत्यक्षात क्षणा - क्षणाला चिंतन प्रक्रिये मध्ये राहून हा विचार जनमानसात पोहचवण्यासाठी केलेले नियोजन अजूनही मनात प्रेरणात्मक वातावरण निर्माण करून जातोय...

मी एक कलाकार आहे त्याच बरोबर भारताचा एक संवेदनशील नागरिक आहे. सभ्यतेची संस्कृती शिकवणारा समाज आता विसरून गेलाय... तरुणांमध्ये देशाबद्दल भावना ,प्रेम  आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करायला. काही ठिकाणी तर देशाचे संवेदनशील नागरिक होण्याचे संस्कार दिले ही जात असतील त्यात वाद नाही.  परंतु, 1992 नंतरच्या पिढीबद्दल विचार करायला गेलो. की, संवेदना कुठेतरी कमी झाल्यासारखे दिसून येते.. कारण, ही पिढी ब्रँड वापरणारी पिढी त्यातच , देशाबद्दल संवेदना म्हणजे यांच्या साठी जुनी परंपरा ... ह्या अशा दूषित वातावरणात राजकीय मंडळी स्वतः च हित जोपासण्यात आपलं जीवन उपभोगत आहे. देशात विकासाने सर्वठिकाणी चिखल केले असताना...राजकारण आणि राजनीती बद्दल संवेदना संपत चालल्या आहेत.


देशाची व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी देशाचं संविधान आणि न्याय व्यवस्था सुरळीत राहणे गरजेचं वाटू लागले आहे. त्यातच भारतातील नागरिकांचा  लोकशाही वरचा विश्वास कमी होऊ लागला आहे. हेच लक्ष आहे सध्याच्या राजकारणाचं . भांडवलदार स्वतः चा फायदा करून  खरेदी आणि विक्री करून जनते जवळील धन लुटत आहेत . भांडवल दारांच्या प्रति सन्मान करणारं सरकार ..सामान्य जनतेच हाल करत आहे.. गरज आहे राजनीति बद्दल संवेदना निर्माण करण्याची...
" थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत " जनमानसात कलेच्या माध्यमातून परिवर्तन आणण्यासाठी कार्य करत आहे .



थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांचे जनक मंजुल भारद्वाज  यांनी राजनीति ला पाहण्याची सकारात्मक दृष्टी विश्वाला दिली. ही रचना राजनीति बद्दल सकारात्मक दृष्टी व्यक्ती च्या मनात निर्माण  करत आहे...

राजनीति बद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने जनमानसात आवाज पोहचवण्यासाठी ...मनात संकल्पना आली राजनैतिक चिंतन रैली च आयोजन करूयात... ह्या रैली च आयोजन करत असताना आपल्याकडे असणारे संसाधन आणि आपल्या  मित्र परिवाराचा सहयोग ...
संकल्पना वास्तवात आणण्यासाठीचा संघर्ष
नवीन संकल्पना , नवीन आवाहन घेऊन येत असते त्याच बरोबर आपली नवीन ओळख निर्माण करत असते. असाच हा वेगळा आणि माझी नवीन ओळख करणारा अनुभव मला आला. संकल्पना घेऊन मी माझ्या मित्र परिवारात फिरत असताना ... खूप साऱ्या नकारात्मकतेचा त्रास सहन करावा लागला.  हे कसं होणार, याच्यातून जीवाला धोका आहे. हिंसेच वातावरण सुरू असताना , हिंसा होण्याची शक्यता आहे.  त्यामध्ये काहीही होऊ शकते.. असं वाटू लागले होते. या सर्वांचे ऐकत बसलो तर बाळ जन्माला येण्यागोदरच गर्भ पडून जाईल. पण, मला ह्या संकल्पनेला जन्म द्यायचाच होता . मग, त्याच नियोजन सुरू झाले... एका बाजूला चोही बाजूने येणारी नकारात्मकता माझ्या मनात जिद्द निर्माण करणारी वाटू लागली...ह्या रैली मध्ये काय काय होऊ शकतो त्याची यादी तयार केली ...त्याच बरोबर नियोजन करायला सुरुवात केली.



रैली बोलल्यानंतर  संकल्पना अशी होते की, खूप सारी गर्दी आणि नारेबाजी ...एकीकडे सर्वांचा आक्रोश... ह्या सर्व गोष्टी डोळ्यासमोर येत होत्या.. मग, मी थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताच्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली .. इथे मला भीड , गर्दी नको आहे. विचार करणारे लोक हवेत... त्यामुळे आता गर्दीचा मुद्दा माझ्या डोक्यातून निघून गेला. दुसऱ्या बाजूला आता आपल्या विचारसरणी मधली माणसे कशी जोडायची हा प्रश्न निर्माण होऊ लागला...संकल्पना मनात आल्या बरोबर ही संकल्पना share करायला सुरुवात केली.. माझ्या समोर  येणारा प्रत्येक व्यक्ती ही संकल्पना ऐकत होता आणि हे कसं होईल ह्या विचारात असायचा दुसऱ्या बाजूला भीती ही मनात त्यांच्या येऊन जायची त्यामुळे एकदा भेटलेला व्यक्ती पुन्हा भेटण्यासाठी टाळाटाळ करत असे ... हीच ती टाळाटाळ माझी हिम्मत वाढवत असे... नाही ! आता तर मी करणारच ... कोण येऊ किंवा येऊ  नये ... ! मी एकटा ह्या रैली ची सुरुवात तर करणार ...


नियोजन बनवलं त्यामध्ये पोलीस परमिशन काढण्याची जबाबदारी एका मित्राला दिली ... काही अंशी तो समोर हो ! हो ... बोलत होता ... पण , त्याच्या आत मध्ये असणारा सभ्य  माणूस त्याला जबाबदारी पासून लांब करत होता ... ह्या रैली मध्ये काय झालं .. तर माझ्या घरातल्या व्यक्तींचं काय होईल ? ... मग, माझ्या मनात दुसरा प्रश्न निर्माण झाला.. ज्यामुळे रैली मध्ये वाद होईल असं काहीही वक्तव्य करायचं नाही . त्यानुसार , नियोजन करायला सुरुवात केली .. मग, जग जाहीर केलं ... आम्ही कोणत्याही व्यक्ती ,राजकीय पक्ष , जात ,धर्म ,पंथ किंवा असं काही करणार नाही ज्यामुळे राजकीय वातावरण बिगडेल ... नारे देताना एकच नारा असेल " हम हैं !" आणि राजनीति ची व्याख्या जी शुद्ध आणि पवित्र आहे. तेच वाचन करत यायचं ...  त्यामुळे वाद होणार नाही याची स्पष्टता आली ...

पोलीस परमिशन काढल्यानंतर माझ्या मनात झालेलं परिवर्तन -


वेळ ठरवल्यानंतर त्या वेळेत काम होणं खूप महत्वाचं आहे . ते नाही झालं की माझ्या मनात चीड - चीड होते . पोलीस परमिशन काढण्याची जबाबदारी माझ्यावर आली. आता काय करायचं  ह्याच्या अगोदर पोलीस परमिशन काढण्यासाठी मी कधी गेलो नव्हतो. मग, पोलीस परमिशन घेण्यासाठी आवश्यक लेटर मध्ये काय काय नमूद असणार ह्याची नोंद मी करून घेतली.. माझ्या नावाने लेटर हेड बनवून मी त्याच्यावर संकल्पना मांडली.  मुद्दे लिहून स्पष्ट शब्दात ते घेऊन पोलीस स्टेशन ला गेलो . लेटर पाहिल्या नंतर पोलिसांचे मिळालेले सहकार्य सकारात्मक ऊर्जा देऊन गेले.
नवीन - नवीन सामाजिक कार्य करणारे ग्रुप , संघटना यांना भेटी देण्यास सुरुवात झाली . नावाला गर्दी करायची नाही आहे हा उद्देश डोळ्यासमोर असल्यामुळे  भेटणाऱ्या व्यक्तीला संकल्पना किती पटत आहे. हे पाहून त्याच्या वैचारिक पातळीला सकारात्मक दृष्टी देत मी विचार करणारा एक - एक व्यक्ती शोधू लागलो.
                                          


Concept स्पष्ट झाली गल्लीचा आवाज दिल्ली पर्यंत मला पोहचवायचा आहे. त्यामुळे रैली निघाली की फेसबुक वर लाईव्ह करायचं आणि नवं चेतना ची तरंग ह्या समाजात सोडायची.

थिएटर ऑफ रेलेवन्स राजनैतिक चिंतन रैली चा परिवर्तनीय काळ - 21 जानेवारी 2018 .सकाळी 7:30 ते 9:00
नक आप्पा पाडा रिक्शा स्थानक ते मालाड रेल्वे स्थानक ..



20 जानेवारी 2018 पर्यंत हृदयात धाकधूक होत होती . राजकीय पहिली पाऊलवाट कशा पद्धतीने निर्माण होईल याच चिंतन सुरू झालं . सकाळी आरशासमोर उभा राहिलो..आरशात पाहून बोललो .." आता मला माझी ही राजकीय भूमिका जगायची आहे" .
सकारात्मक उर्जेनिशी घरातून निघालो. सकाळची येणारी मादक हवा मनाला स्पर्श करत होती..वातावरण तेजोमय झालेले...

अप्पा पाडा रिक्षा स्थानकापासून प्रस्तावना करून चिंतन रैली निघाली . सकारात्मक व्याख्येचे वाचन करत असताना वातारणात कुतुहल निर्माण झालेले . प्रत्येक सहभागी  आपल्या जबाबदारी ने ऊर्जेमध्ये सहभागी झालेले. माझी भूमिका एकाच वेळी चौफेरी होती. रैली च्या आत मध्ये लक्ष देणे , बाहेर रिस्पॉन्स पाहणे, व्याख्येच वाचन करणे.
                        
क्रांतिकारक पतीवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. हे दिसू लागले . रैली चा उद्देश साध्य झाला .. सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला जाणवू लागले . राजनीति पवित्र आहे . मला त्याच्यात सहभाग घ्यायला हरकत  नाही . गर्दी काहीच करत नाही पण, व्यक्तीच्या आत निर्माण झालेला लीडर परिवर्तन स्वतः करतो . त्याचबरोबर समाजात करून घेतो ...
 


थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताने मला दिलेली राजनीति ला पाहण्याची पवित्र दृष्टी त्यातून झालेलं परिवर्तन .. माझ्यातील व्यक्तीला ला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जात आहे. त्याचा मला अभिमान आहे..
रंगकर्मी
तुषार म्हस्के

2 comments: