Sunday 15 March 2015

कलाकाराच्या सत्वाची आग ......

आगीत जळणाऱ्या निखाऱ्याला जाळण्याची भीती नसते …….
हृदयात जळणारी आग डोळ्यातून जाणवू लागते  ……
ती भगत सिंघ ने डोळ्यात साठवून ठेवली  ……
तडफ फक्त …… एकच ……
सत्तेला झुघारण्याची ……
नवीन सत्ता स्थापित करण्याची ……
सत्ता आणि सत्ताच फक्त जीवन जगण्यासाठी निर्माण केली जाते ……
फक्त आम्ही सामान्य म्हणून जगणार …….
स्वातंत्र ज्यांच्या साठी निर्माण केला त्यांना जाणीव तरी आहे का  त्या आगीची ……

म्हणून कदाचित राजकारण म्हणजे किळस येतोय ……
आम्ही फक्त लाचारासारखा सत्तेतील ठेकेदारांसाठी आपल्याच बांधवांचा रक्त पिणार …
साला लाज वाटते लोकशाहीची ……
लोकशाहीच्या नावाखाली धंदा करणाऱ्या भांडवलदारांची …
‘ घंटा ‘फक्त आम्ही पाहणार आयुशातून निघून जाण्यासाठी   …
पानसरे , नरेंद्र दाभोलकर सारखे विचार मारले जाणार …
साला  हे ठेकेदार एक गोष्ट विसरतात ……
विचार कधी मरत नाहीत …ते आगी सारखे उफाळून बाहेर येतात …
बोलू लागतात …… ‘’ मेरा रंग दे बसंती चोला ……  माहे रंग दे बसंती ……
हसत हसत मृत्यूला कबूल करतात
हि ती आग आहे एका कलाकाराच्या सत्वाची आग …

No comments:

Post a Comment