Tuesday 3 March 2015

प्रत्येक क्षणो क्षणी वाढत जाणारा प्रवास ......

प्रत्येक माणसामध्ये एक कलाकार आहे . …हा कलाकार त्याच्या सध्य परिस्थितीमधून निर्माण झालेला आहे …प्रत्येक क्षण जगता जगता क्षणामध्ये तो आनंदाने भूमिका करत आपले जीवन जगत आहे … आनंदाने जगता जगता तो परिस्थिती शी आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांशी भावनिक संबंधामध्ये अडकून जातो ….
काही वेळ या भावना अनावर होवून जातात ……फक्त अपेक्षा वाढत जातात …… वाढत जाणाऱ्या अपेक्षा या  या परिस्थितीला बदलून टाकतात …… त्या परिस्थिती मध्ये कलाकार हा मारला जातो ……माणूस म्हणून जगण सोडून फक्त इतरांना सल्ले देण्याचे काम करतो …कदाचित, ते सल्ले खूप महत्वाचे हि असतील …दिलेल्या सल्यांना तो सर्वस्वी मानून समोरच्या व्यक्तीवर हुकुम करण्यास सुरुवात करतो ……
कदाचित  ‘ हुकुम’ हा समोरच्याला मान्य नसेल …काही काल तो ऐकणे सोडून देतो  …… आणि तो काही काल लांब निघून जातो …. त्यामध्ये हा फक्त विचार करत बसतो आणि समोरच्या व्यक्ती ला दोष देण्यास सुरुवात करतो … आपल दम घुटत जीवन जगतो …त्यामधल्या कालावधीत समाज , संस्कृती ,परंपरा , जात , धर्म  यांनी मनात आपल एक स्थायी अस्तित्व निर्माण केलेलं असत …या ठिकाणी तो विसरून जातो मी माणूस आहे …त्या दरम्यान तो आपल्या भावना हिंसेच्या मार्गाने बाहेर काढतो …कारण , त्या दरम्यान स्वताच हुकुम आणि नफा कमवणाऱ्या सत्तेतील राजकारणी लोकांनी आपली ’’ प्रतिमा ‘’ देवासारखी बनवलेली असते …… मग, त्यावेळी देव सांगेल ती पूर्व दिशा …त्यामाघे हरवून जातो तो सामान्य माणूस …सामान्य समजून गुलामगिरीमध्ये जीवन जगण्यास सुरुवात करतो …… त्यामध्ये मरतो तो ‘माणूस ‘ ,  आपण  ज्याला मारतो  तो ‘कलाकार ‘ ….
आपल स्वताच असं मत न राहता लाचार झालेला सामान्य माणूस नजरेसमोर दिसत राहतो ….

या परिस्थिती मधून पुन्हा आनंदाने जीवन जगण्यासाठीचा घेतला जाणारा शोध …आनंदाने अनुभवलेले क्षण पुन्हा उभारण्यासाठीचा घेतलेला आढावा …
आकाशाकडे पाहता पाहता स्वताच्या अंतर्मनात पाहणे त्यांना  शोधून त्यांच्याशी  एकरूप होवून त्यांच्या  बरोबर जगणे …… अशा अंतर्मनातील वैचारिक पातळीवरील कलाकाराचा शोध ……रंगांच्या नुमाइशे पेक्षा अंतरंगातील केलेली रंगांची साधना …… शरीराबाहेरील सौंदर्य नेहमी दिसत राहत ……
मनातील सौंदर्य आणि त्याचे तेज शरीरातील प्रत्येक अवयव त्यामध्ये सुंदर होतो …मग तो शरीराच्या आतमधील भाग असो व शरीराच्या बाहेरील भाग असो …….प्रत्येक अवयवांची व्यापकता हि प्रत्येक क्षणो क्षणी वाढत जाणारा प्रवास ‘’ unheard  sounds  of  universe ‘’   कलाकार म्हणून जगणाऱ्या व्यक्तीमत्वाचा प्रवास …… second  Phase सुरु होत आहे ४ ते ८ मार्च २०१५ . शांतीवन, पनवेल …

1 comment: