Wednesday 25 February 2015

कलाकार म्हणून जगण्याची हि एक आग आहे ……


हि एक आग आहे …. माझ्या अंतर्मनातील कलाकाराला शोधण्याची ……एक असा कलाकार …… ज्या कलाकाराचे मन वाहत जाते …… एकदम टोकाची भूमिका घेवून …… आपल अस्तित्व कायम ठेवण्याचा हा प्रयत्न करत असतो …… ती एक आग आहे …… तो एक विचार आहे …… जो वैचारिक पातळीवर काम करताना दिसत आहे ……. प्रत्येक मनुष्या मध्ये एक कलाकार जगत असतो …….फक्त मार्ग दाखवणारे आपल्या स्वार्थासाठी आणि आपल अस्तित्व कायम ठेवण्यासाठी …… ते त्या कलाकाराला दाबून ठेवतात ……  समाज,संस्कृती , परंपरा ,जाती, धर्म यामध्ये अडकून आपल कलाकारच आयुष्य हरवून जातो …मग , खूप काल तो शोधत राहतो माझ सुख कशात आहे ? ….हा प्रश्न पडल्यानंतर …… तो निरागस होवून जातो …… मग समोर येणाऱ्या परिस्थिती ला आपली जगण्याची परिस्थिती समजतो आणि हतबल होवून त्यामध्ये अडकून जातो …… थोड्याश्या अमिशाखाली काम करतो …लाचार होतो …हे लाचारी , हे गुलामी तोडून ज्यावेळी तो पुढे येतो …… त्यावेळी त्याच्या कलेची व्यापकता हि अवर्णनीय वैचारिक पातळीवर , वैश्विक पातळीवर काम करताना दिसते …आपल्या सर्वव्यापी कलाकाराचा शोध म्हणजे unheard ……. त्या  कलाकाराचा शोध मला  थियेटर ऑफ  रिलेवन्स च्या कार्यशाळेत  पहायला मिळाले ……

No comments:

Post a Comment