#मुंबई
आज मालाड ते दादर ट्रेन ने प्रवास करत असताना... ट्रेन चा येणारा आवाज... ट्रेन च्या आत मध्ये असणारी माणसे... त्यांच्या होणाऱ्या गप्पा... विस्तारलेले मुंबई शहर... प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करणारी मुंबई... पोटा - पाण्याच्या शोधात आलेले चाकरमानी, अस्तित्व निर्माण करण्यासाठी आलेले कलाकार... पैसे कमावण्यासाठी मुंबईत आलेली माणसे... मुंबई सगळ्यांना बघते... प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुंबई ही ती जागा प्रत्येक व्यक्तीला देते... जगाच्या कानाकोपऱ्यातून माणसे येतात... आणि आपली ओळख निर्माण करतात...?
मुंबई स्वप्न बघणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण करते... आणि आपण मुंबईला काय देतोय... ? अशुद्ध हवा, कचऱ्याचे डोंगर, स्वतः च्या स्वार्थासाठी जंगलांची तोड, समुद्र किनारपट्टीवर मुंबईचे रक्षण करणारे झाडे ( mangroove ) तोडतो.. एकदा तरी विचार करतो का ? ज्या मुंबईने आमची स्वप्न पूर्ण केली आहेत त्या मुंबईला स्वतःच्या स्वार्थासाठी संपवत आहोत ? ज्या भूमिपुत्रांच्या जमिनीवर मुंबईकर राहत आहेत... त्यांना बेघर करतोय ? अशा अनेक प्रश्नांनी मनात एकच वादळ निर्माण केले...
मंजुल भारद्वाज रचित नाटक द... अदर वर्ल्ड ची प्रस्तुती आम्ही 24 जानेवारी 2026, सकाळी 11.00 वाजता . श्री शिवाजी मंदिर, दादर येथे करणार आहोत... प्रेक्षक संवादाच्या माध्यमातून... मुंबईच्या प्रकृतीला निरोगी ठेवण्यासाठी मुंबईकरांच्या मेंदूत विचारांच झाड लावण्याचा संकल्प घेऊन आम्ही मुंबईकरांना भेटत आहोत... संवाद करत आहोत....
हम हैं !
रंगकर्मी तुषार म्हस्के

No comments:
Post a Comment