आज , दादर मध्ये
मुंबई सर्वसामान्य माणसांची...आज दादर मध्ये चालत असताना आठवणी जाग्या झाल्या... श्री शिवाजी मंदिर, मध्ये पाय ठेवल्यावर संपूर्ण 2015 पासूनचा इतिहास आठवला... मंजुल भारद्वाज रचित नाटक " अनहद नाद - Unheard Sounds of Universe" या नाटकाने रंगभूमीची दिशा बदलली... तो प्रवास होता.. रंगभूमीला घडवण्याचा... रंगभूमीला घडवण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे प्रेक्षक...
प्रेक्षक संवादाच्या माध्यमातून आम्ही थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताचे रंगकर्मी... शोध घेत निघालो प्रेक्षकांचा... अगदी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलो... एक - एक व्यक्तीला भेटत संवाद करत आम्ही लोकांमध्ये नाटकाविषयी आदर, जबाबदारी, प्रेम, जाणीव निर्माण केली... त्या छोट्याशा रोपट्याचे आज वट वृक्षामध्ये रूपांतर झालेले आम्ही अनुभवत आहे... सर्व सामान्य माणूस नाटकाकडे पुन्हा वळत आहे... तो आवर्जून विचारतो... " यावेळी, तुमचं कोणतं नाटक आहे... ! " आम्हाला पहायचं आहे... आम्ही नाटक पहायला येणार आहे...
यावेळी, आम्ही मंजुल भारद्वाज रचित नाटक द... अदर वर्ल्ड ची प्रस्तुती श्री शिवाजी मंदिर येथे करणार आहोत... येत्या 24 जानेवारी 2026, सकाळी 11.00 वाजता...
आम्ही आता मुंबई मध्ये प्रेक्षक संवादासाठी सज्ज आहोत... भेटुयात, बोलुयात, संवाद साधूयात ... माणसाच्या आतील निसर्ग जागृत करुयात... माणसाच्या मेंदूत एक झाड लावुयात...
हम हैं !
रंगकर्मी
तुषार म्हस्के

No comments:
Post a Comment