Sunday 23 July 2017

जीवनात सतत नव्याने बदल स्वतः मध्ये अनुभवत आहे ...कारण, जीवन जगत असताना शिकण्याचा भाव आणि कर्म करण्याची उमेद निर्माण झाली आहे ...10 वी च्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी आर्यन्स ऑकडमी , बोरीवली या कोचिंग क्लासेस ने 3 तासासाठी बोलावले होते ...


दिनांक 22 जुलै 2017, वेळ 6.30 ते 9.30 ठरली .. मी व स्वाती वेळेत पोहोचलो ...सेशन ला सुरुवात झाली 26 विद्यार्थी होते ..हम हैं ! चा आवाज आणि व्यवस्थे मध्ये बदल होऊ लागला .आवाज वाढू लागला व त्यामध्ये सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा आवाज वाढत होता...मग, विचारले काय वाटतय तुम्ही असे बसत आहात तर एकमेकांना पाहताय का ? मग ती व्यवस्था बदलली त्याच बरोबर अलर्ट नेस वाढू लागला..सर्वजण आपोआप ताठ बसायला लागले ...


मग, ग्रुप केले 5 जणांचे 4 आणि एका ग्रुप मध्ये 6 जण असे केले ...मी जाणीव करून देत होतो destruction प्रवृत्ती काय असतेे ,बोलत असताना मध्येच कोण रुमाल हातात घेत होत , कोणाच्या हातामध्ये कागद होते त्याच्याबरोबर खेळणे ,केसांना हात लावणे , नखे खाणे या मुळे आपलं लक्ष लागत नाही ...त्याच्यासाठी जाणीव सजगतेने करून देत होतो ... त्यामुळे आपोआप या हालचाली बंद होत होत्या ...ग्रुप ला सांगितलं तुमच्या आवडी काय आहेत त्या तुम्हाला ग्रुप मध्ये शेअर करायच्या आहेत आणि त्याचं presentation करायच आहे ...त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना बसवल होते..ग्रुप मध्ये चर्चा सुरु झालेली सुरुवातीला लक्ष न देणारे विद्यार्थी आता एकत्र बसले होते व आपल्या अवडी सर्वाना सांगत होते ...आणि त्याच सादरीकरण कस कारायच ती चर्चा सुरु होती ...न बोलणारे विद्यार्थी आता लीड करताना दिसू लागले ...त्यांच्या मध्ये लीडर दिसत होते ... आता , प्रेजेंटेशन करायला सुरुवात झाली ...एक एक शब्द 26 जणांसमोर बोलणं काय असत ते समजत होते ...त्यावेळी मला समजलं एक शब्द बोलणं आणि त्याच्यासाठी किती संघर्ष त्यांच्यामध्ये होत होता ...आता पर्यंत पुस्तक वाचणारे विध्यार्थी जीवनाचे पुस्तक वाचण्यासाठी अजून तयार नव्हते कारण, शिक्षणाने त्यांना तयार केले नव्हते ...की, तयार झाले नव्हते ? हा प्रश्न आहे ...काय तळमळ होती ती 25 जणांसमोर आपली आवड सांगणे ते सांगत असताना " तू बोल रे "ची मानसिकता आणि शेवटी सर्वाना बोलायला लागणार आहे हे माहिती आहेच तरीही" तू बोल ,तू बोल ...आयुष्यात कधीही अशा पद्धतीने बोलले नाहीत ते त्यांचे अनुभव सांगत असताना मन मोकळे झाले आणि मला समजलं एका शब्दाची अभिव्यक्ती आणि त्याचे समाधान काय असतं , शब्द बोलत असताना त्यांचे तापलेले शरीर चंचलता वाढवत होती.



त्यातच डोळ्यातून पाणी वाहत होते ते पाहून क्लास मधील विद्यार्थ्यांनच्या डोळ्यात पाणी येत असताना दिसत होते . फक्त बोलायला मिळणे आणि रडणे की आता पर्यंत कोणी वेळच दिला नाही असं बोलायला .त्यामुळे स्वतःचा असा स्पेस मिळणं हेच केवढं मोठं समाधान असतं हे मला या सेशन मध्ये मिळाले...त्यातच ते कसे बसे आपली आवड सांगून जायचे आणि ते सांगितल्यावर सुटलो रे बाबा असा श्वास घ्यायचे..आता , हे प्रेजेंटेशन झाल्यावर त्यांना विचारलं की काय कस वाटलं ? त्यावेळी त्यांचे उत्तर होते . "मी आता पर्यंत कधीच एवढ्या जणांसमोर बोललो नाही आहे .पहिल्यांदा बोललोय , माझ्या आईवडिलांना मी माझ्या मनात असणारी आवड सांगितली नाही ती सांगितली , पहिल्यांदा मी पुढे आले आणि बोलले " अशा पद्धतीने वेगवेगळी उत्तरे ऐकून मी भारावून गेलो , एवढीशी प्रक्रिया आणि त्या प्रकिर्येची व्यापकता दिसत होती .या सर्व प्रक्रियेत वेळ पाहणं आणि त्यामध्ये 2 तास तर निघून गेले होते आणि साध्य हे होत प्रत्येक जण बोलला होता ... कारण त्यामुळे आता active participation सर्वांचं वाढलं होत ...आता थोडा वेळ घालवाचा नाही हे समजले ..मग, पुन्हा त्यांचे ग्रुप केले आणि त्यांची स्वप्ने आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल हा प्रश्न दिला आणि त्याच्यासाठी वेळ फक्त 10 मिनिटे दिली होती...आणि त्या 10 मिनिटांमध्ये ते तयार झाले बरं , जे आता पर्यंत मस्ती करत होते,अभ्यासात मागे होते ते विद्यार्थी आता पहिल्यांदा बोलू लागले .आम्ही पहिलं presentation करणार "वाह ! चांगलं वाटलं .


एवढा एक बदल तर जाणवत होता सर्व जण अलर्ट, आणि हो लगेच कृती करत होते ... आणि सर्वांना हसत खेळत सहभागी करून घेत होते. आता , पुढे त्यांना प्रश्न केला की तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय आपण शिक्षण घेतोय ते उपयोगी आहे का ? आणि उपयोगी आहे तर मग , का आपण अभ्यास नाही करत . आणि उपयोगी नाही आहे तर का मग, शिकतोय ? त्या पद्धतीने सर्व जण शांत झाले ..का आपण आपली जबाबदारी नाही घेत ..मग, जबाबदारी कोण घेणार ...या प्रश्नावर उत्तरे आपोआप येत होती " मी " घेणार म्हणून ...पुढे त्यांना प्रश्न विचारला आजच्या दिवसात काय वेगळे शिकायला मिळाले ...त्यावेळी आलेली उत्तरे आयुष्यात कस जगायचं ते समजलं , आपलं मत मांडणे , स्वतःला समजून घेणे , विचार कृतीतून करणे , ध्येय ठरवणे , अभ्यास करता करता आवडी जोपासणे ...हे ऐकत असताना एक समाधान मला मिळत होते कारण, आज जाणीव पूर्वक सेशन मी घेत आहे त्याच उत्तर त्यांचा फीडबॅक ऐकत असताना होत होता ...


 
गोलाकार सर्कल मध्ये सर्वांना उभे केले आणि कलात्मक उन्मुक्ततेचा स्वरामध्ये " मेरा रंग दे बसंती चोला " च्या सुराने सर्व विद्यार्थ्यांना एकमेकांचे हात पकडून उभे केले ...हे स्वर ऐकल्यानंतर डोळे गहिवरलेले आता पर्यंत दाबून ठेवलेले भाव डोळ्यातून पाण्यावाटे बाहेर पडणारे... उन्मुक्ततेची जाणीव करणारे..आणि विद्यार्थ्यांना शिकण्याच्या भूमिकेत आणणारे ...

थिएटर ऑफ रेलेवन्स ची ही प्रक्रिया मला एक उत्प्रेरकाच्या भूमिकेत खंबीर करत आहे ...याची जाणीव हे सेशन घेत असताना होऊ लागली...

रंगकर्मी
तुषार म्हस्के

1 comment: