Wednesday 5 July 2017

कुरार व्हिलेज मध्ये असणाऱ्या या रिक्षावाल्याना माझा सलाम आहे ....तुषार म्हस्के

रिक्षा वाले म्हटल्यानंतर आता पर्यंत आपल्यासमोर येणारी छबी ही ...अरे रावी आणि उद्धट पणाची आपल्याला दिसते ...महत्वाच्या ठिकाणी पोहचायचं असेल आणि त्यावेळी हे रिक्षा वाले कधीच वेळेत मिळत नाही त्याच्यावरून स्वाभाविक एक नागरिक म्हणून आपली चिडचिड होत असते ...या सर्वांच्या पलीकडे मालाड कुरार व्हिलेज मधील रिक्षावाल्यांनी आपली एक सामाजिक भूमिका ओळखून मालाड पूर्व ...वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे लगत असणारा लोकल रस्ता जो दफतरी रोड म्हणून प्रख्यात आहे तो रस्ता गेली 12 महिने असाच खड्डे आणि धुळीचा होणारा त्रास रिक्षावले ...सहन करत होते ...इथे फक्त रिक्षावले नाही तर इथे सर्व सामान्य जनतेला होणारा त्रास ...

ट्रॅफिक 1 ते 2 तास तशीच असायची ...त्यामुळे घशाचे होणारे आजार ...आणि हृदयाचे होणारे आजार तर मालाड वासीयांनी अनुभवलेला आहे ...पण, त्याच्यासाठी हा सामान्य वर्ग कधीच तयार झालेला पाहिला नाही ...


रिक्षा वाले ( कुरार मधील त्या मध्ये राईट रिक्षा स्टँड , रमेश रिक्षा स्टँड आणि ओमकार रिक्षा स्टँड ) या रिक्षावाल्यांनी सतत महानगर पालिकेला पत्र देण्यापासून ते स्थानिक नगर सेवक आमदार यांना वारंवार तक्रारी केल्या , त्यामध्ये लेखी तक्रारी या होत्याच ...
परंतु , महानगरपालिका आपल्या सोयीनुसार काम करताना दिसत होती ...रस्त्याची अवस्था तर पावसामुळे अजूनच खराब झाली होती ...रस्त्यावर लावलेले ब्लॉक्स अगदी खराब झालेले होते ...जागो- जागी खड्डे पडलेले ...यांच्यातून रिक्षा मधून प्रवास करताना हालत एकदम खराब होऊन जायची ....
शारीरिक आणि मानसिक अवस्थेत प्रवास करणारे प्रवासी आणि गाड़ी चालक आणि सामान्य नागरिक एकदम त्रासून जायचे ...अशा परिस्थितीत ओमकार , राईट आणि रमेश हॉटेल चे रिक्शा वाले एकत्र आले आणि ...त्यांनी एक पाउल उचलले आणि स्वतःहून है खड्डे बुझवायला सुरुवात केली रिक्शा बाजूला उभी करुन खाकी कलर चे कपड़े आणि यामध्ये उभा असणारा रिक्षावाला आज मी रस्त्यावर काम करताना पाहिला 25 ते 30 रिक्षावले स्वतःसाठी स्वतःच्या पोटासाठी जरी काम करत होते...
 तरीही ते सम्पूर्ण मालाड वासीयांसाठी होणाऱ्या त्रासातून त्यांना बाहेर काढण्यासाठी स्वतः सिमेंट वाळू ...आणि विटांचे तुकडे यांनी खळगे भरत होते ....मुंबई , मालाड ,कुरार व्हिलेज मध्ये असणाऱ्या या रिक्षावाल्याना माझा सलाम आहे ....



तुषार म्हस्के
दिनांक:- 5 जुलै 2017
मालाड ( पूर्व ),मुम्बई.

3 comments:

  1. https://m.facebook.com/story.php?story_fbid=1626840597366957&id=100001230961069

    ReplyDelete
  2. https://www.linkedin.com/pulse/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%B1%E0%A4%AF-%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B7%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%9D-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%B9-tushar-mhaske?published=t

    ReplyDelete
  3. NYC work done by riksha driver

    ReplyDelete