Wednesday 11 January 2017

मी शोधतोय माझ्या समाजात “ सावित्री "......

मी शोधतोय माझ्या समाजात “ सावित्री “... मंजुळ भारद्वाज यांच्या नाटकामधील हा संवाद आणि हाच संवाद आहे जो सावित्रीबाई फुले यांचे विचार जिवंत ठेवतो ....आणि त्या सावित्रीची दृष्टि समाजात शोधतो ....मना मध्ये ध्येय  आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी केलेला प्रण म्हणजे आपली साधना ही साधना चेहऱ्या वर तेज वाढवते .....

तुषार, या कार्यक्रमानंतर तू एकदम चमकत आहेस ...ती शांतता तुझ्या चेहऱ्या वर दिसत आहे .....असं माझी सखी मला बोलली ...त्याच बरोबर मी तिच्याकडे पाहिलं ...तिच्या चशम्यामधून तिचे डोळे चमकताना जाणवले ...आणि तिचे शब्द आठवले ..... I am proud that...I am girl …. “ मैं औरत हूँ ” ...याच्यापेक्षा मोठं समाधान काय असणार ? ....म्हणजे केलेले कार्य संपन्न झाल्यासारख वाटले ....त्याच रस्त्याने चालत मी घरी आलो ...आणि घरामध्ये पाहिलं ..तर वातावरण प्रसन्न वाटलं रात्रीच जेवून झोपायला गेलो ....त्याच बरोबर १० दिवसाची यात्रा डोळ्यासमोर आली ....एक – एक  चित्र डोळ्यासमोर उभे राहू लागले ....काय झालं ? कसं झालं ? ....हि यात्रा डोळ्यासमोर उभी राहिली .... राजनैतिक अजेंडा घेऊन मी राजकारणी लोकांना भेटायला सुरुवात केली ....व्यक्तीचं समजामध्ये असणार रूप ....त्याची समाजात असणारी ओळख ...आणि त्याच्याबरोबर मी त्याला ओळखतो असा दृष्टिकोन ...त्यामध्ये त्याची असणारी प्रतिमा ... एका बाजूला काही नेते हे भांडवल दारांचे गुलाम झालेले ...दुसऱ्या बाजूला बिल्डरांनी त्यांना विकत घेतलय ....आणि ते नेते आपल्या विभागात काम न करता उगाचचं मोठ मोठ्या गुंड् मंडळींचा वापर करून घाबरवण्याची कामे करत त्यांच्या समोर जायचं ...कि , नोटबंदीच्या नावाखाली सामान्य लोकांचे हाल करून भांडवलदारांना मोकाट सोडणाऱ्या ...पक्षाकडे जायचं ....कि , जे नेते आपल्या खिशातून पैसे टाकून लोकांच्या समस्या सोडवणार्यांकडे जायचं ....असा प्रश्न मला पडला ...त्यावर माझ्या मनामध्ये एक आशेची किरण जागी झाली ...ती म्हणजे समस्या सोडवणाऱ्या लोकांकडे जाण्यास सुरुवात केली ...जाऊन भेटलो ...स्वताची ओळख करून दिली...माझी फाईल दाखवली ...आणि राजनैतिक चर्चा सुरु केली ... प्रश्नांना उत्तर आणि नवीन प्रश्न ....त्यातून होणारी चर्चा याने माझी एक तटस्थ राजनैतिकाराची भूमिका थियेटर ओफ रेलेवंस नाट्य सिद्धांतामध्ये तयार झालेली जाणवली ...त्यामध्ये बदल जाणवला तो म्हणजे ...व्यक्तीकेंद्रित राजसत्तेला विरोध त्याच बरोबर ...संविधानिक सत्ता सुरु ठेवण्याचे सूत्र शोधणारी माझी मानसिकता ....या गोष्टी बोलताना मी कलाकार असल्याची सामाजिक जाणीव .... त्याच बरोबर, हे जाणवू लागले आपल्याला समाजामध्ये बदल घडवण्यासाठी आपल्या आई ला म्हणजेच ...महिलांना सक्षम करणे त्यांच्या मनात असणाऱ्या पितृसत्तात्मक विचारांना थांबवणे ...बरं , आता हि मोहीम कशी सुरु करणार .... मंजुळ भारद्वाज लिखित नाटक “ मैं औरत हूँ ” या नाटकाचा प्रयोग आपण   कुरार मध्ये ठेवणार ...त्याच्यामागची भूमिका स्पष्ट होती ...कोणी बघायला आलं तर उत्तमच आहे आणि नाही आलं तर माझी मम्मी हे नाटक बघणार  हे ठरलं|

                            

 ....आता ,  राजकारणी लोकांना भेटण्याची मोहीम सुरु केली ...त्यांना सांगितलं ३ जानेवारी २०१७ ला कार्यक्रम ठेवायचं आहे त्या मध्ये आमचे अंतरराष्ट्रीय कलाकार येणार आणि नाटक सादर करणार त्याच्यासाठी तुम्ही काय करणार ? ....मुळात, ७ दिवस बाकी होते ३ जानेवारीला आता पहिला म्हणजे हे ऐकूनच सर्वांची बोलती बंद झालेली कि , हे नाटक बघायला कोण येणार ? ...हे असं वैचारिक नाटक चालत का ? या सर्व मनाच्या आत मधल्या गोष्टी होत्या ...हा कार्यक्रम फ्लोप होईल ... त्यामुळे समाजामध्ये negativity पसरेल ..... मी शांत ऐकत होतो ....थोड्या वेळात सर्व ऐकून घेतलं आणि मी बोललो ...तुषार म्हस्के कार्यक्रम लावणार तुम्ही येणार कि नाही ....या ठिकाणच्या महिला येणार कि नाही ? ...थोडं हवेतील उत्तरे मिळाली .... आता नवीन संकल्पना
मांडत असताना ...मला माहिती होत कि हि कशा पद्धतीने सादर करायची आणि त्याच्यासाठी मला काय करायचं आहे ? ....आणि खरोखरच ती एक जिद्द मनात निर्माण झाली कि आता मी काहीही करून प्रयोग हाऊसफूल करणार ...? ....लगेच , कामाला सुरुवात केली ....ताबडतोब चर्चा करण्यास सुरुवात केली आणि ...मला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बोलू लागलो ...३ तारखेला मालाड मध्ये “ मैं औरत हूँ ” चा प्रयोग आहे क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले दिना निमित्त ...तुमच्या आजूबाजूला सर्व महिलांना सांगा ....माझ्या विचारांप्रमाणे डोळ्यासमोर असणारी परिस्थिती बदलू लागली .....त्याच्या मध्ये एक सूत्र हातात घेतले ... आपल्याला प्रत्येक दिवशी मंजुळ सरांबरोबर बोलायचं आहे त्याच बरोबर टिम बरोबर संवाद करायचा आहे त्यासाठी प्रत्येक दिवशी यांच्या संपर्कामध्ये राहिलो ... मग, निमित्त साधून सरांना फोन करणे ...त्यांना फोन वर अपडेट करणे ...त्याच बरोबर टिम बरोबर बोलणे यामुळे एक उर्जा निर्माण होण्यास सुरुवात झाली ... आणि एक खास गोष्ट जाणवली ती म्हणजे ...थोडाही निराश झाल्यावर मंजुळ सरांना फोन करणे ...फोन लावण्या अगोदरच एक सकारात्मक ऊर्जा माझ्या जवळ येत असताना जाणवायची ... माझ्या समोर कामे एका मागून एक अशी रांगेत उभी होती ....त्यांना संपवत - संपवत पुढे जायचं ... हे सूत्र माझ्या आत मध्ये आग लावत नवीन विचारांना जन्म देऊ लागले ....एका event म्हणजे आता पर्यंत फक्त त्रासच अंगावर ओढावून घेतला होता .....हा event करत असताना अजिबात त्रास नव्हता ..... या होणाऱ्या वैचारिक क्रांती बद्दल मी बाहेर बोलायला सुरुवात केली ...त्याच बरोबर आमच्या शाळेच्या सेक्रेटरी यांनी याला प्रतिसाद दिला कार्यक्रम निश्चित झाला ...एक पाउल पुढे टाकत मी घेतलेला निर्णय पूर्ण करण्याची हि वेळ माझी आहे हे जाणवू लागले ...सावित्री बाई फुले दिनानिमित्त हे सादरीकरण करण्याचे ठरले ...वेळ सायंकाळी ५ वाजता ची ठरली .... थियेटर ऑफ रेलेवंस नाट्य
सिद्धांतामध्ये प्रेक्षक हाच मोठा आणि सशक्त रंगकर्मी आहे ....त्यानुसार मी या कार्यक्रमासाठी माझ्या मम्मी पासून चाळीतील महिलांना सांगायला सुरुवात केली ...त्यामध्ये बचत गट ज्यांचे आहेत अशा महिला ....त्यानंतर जो व्यक्ती भेटेल त्याला या कार्यक्रमाबद्दल सांगाणे ...प्रत्येक क्षणाला त्याची चर्चा करणे ....आणि ज्या ठिकाणी राजकीय चर्चा होतील अश्या ठिकाणी ....४ ते ५ चाळींमध्ये मित्रांच्या घरातल्यांना या कार्यक्रमाबद्दल सांगितले आणि एक वातावरण , एका वातावरणाची निर्मिती करत याचा प्रचार आणि प्रसार करत होतो .. कार्यक्रम शाळेत

असल्यामुळे शाळेतील मुख्याध्यापकांना भेटून विचारणा केली ... त्यावेळी जाणवले त्यांनी या कर्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांच्या पालकांना सांगायला सांगितले ...दुसऱ्या banner २  लावले , पोस्टर चे २५  ते ३० प्रिंट आउट चाळींमध्ये मित्रांना लावायला प्रेरित केले .... हे एक टिम वर्क आहे ...आणि माझ्या अंगा मध्ये एक टिम कार्य करत आहे हे जाणवू लागले ....आणि एक जाणीव या मध्ये सतत दिसली ...ज्याला सद्सद विवेक बुद्धी दिसली ती म्हणजे हा कार्यक्रम माझा आहे आणि याचे आयोजन मला करायचा आहे ... आणि कोणासाठी नाही माझ्या  मम्मी साठी हा प्रोग्राम करायचा आहे ... त्यामुळे कोण या कार्यक्रमाला येईल याची चिंता मनात आलीच नव्हती ... हि तयारी सुरु असताना एका मागून एक संसाधने निर्माण होऊ लागली ..मी फक्त निसर्गामध्ये आता मला काय हवय त्याचा विचार केला तर , आपोआप माझ्यासमोर त्या गोष्टी येऊन उभ्या राहत होत्या .... त्यामुळे त्याचं एक समाधान मला मिळू लागले ....

३ जानेवारी २०१७ , सकाळी ५ वाजता मी आणि माझी सखी आम्ही दोघे चैतन्य अभ्यास करण्यासाठी निघालो कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल


तिच्याबरोबर चर्चा केली... माझ्या घेतल्या जाणाऱ्या निर्णयाबद्दल तिची नेहमीच प्रेरणा दायी सहमती मला मिळते   ... दिवसभरात काम काय करायचं आहे ?  याची आखणी केली ....विचारांच्या वेगात ....माझा स्पीड मी वाढवला ...लगेच शाळेत जावून काय सुरु आहे काय त्याची आखणी आहे ....किती माणसे बसतील कसे बसतील ? त्यामध्ये प्रेक्षक जास्त झाल्यावर काय करता येईल ? याचे प्रतिबद्ध नियम बनवले ...जाऊन स्वताहून पाहणी केली ....नाटक गांभीर्य त्याचं बरोबर कलाकार कोण आहेत त्यांची माहिती शाळेतील शिक्षकांना दिली ....आणि मनामध्ये एक माझ्या कालाकारांबद्द्ल एक स्थान आहे त्या पद्धतीने त्या वातावरणामध्ये त्यांची या वर्षांमधील साधना प्रसार केली ...मग ,ड्रोप बाय ड्रोप वाटर ,छेड छ्याड का ? ...अनहद नाद ,गर्भ ...त्यामध्ये माझे कलाकार आहेत ...त्यामुळे त्यांचा आदर आणि त्यांची ओळख यांच्याकडे मी प्रत्यक्ष लक्ष केंद्रित केले ....माझ्या छोट्या भावाला कलाकारांना घेऊन येण्यासाठी पाठवले त्यांना काय हवय नकोय ? याची संपूर्ण जबाबदारी त्याच्याकडे .....कार्य क्रमाची जबाबदारी माझी ....घरामध्ये कलाकार आल्यानंतर त्यांना काय हवय नकोय त्याची जबाबदारी माझ्या घरातल्यांनी घेतली ....कार्यक्रमाच्या ठिकाणी लागणाऱ्या सर्व वस्तूंची , आणि आयोजनाची जबाबदारी शिक्षक आणि शाळेचे सेक्रेटरी घेऊ लागले .....एक गोष्ट जाणवली पितृसत्तात्मक समाजामध्ये महिला शिक्षक वर्ग या कार्यक्रमाचं आयोजन करताना दिसला ....कारण, हा महिलांचा कार्यक्रम आहे ... आणि हिच समाजव्यवस्था आहे ...ज्या ठिकाणी महिला आणि पुरुष एकात्मतेची विचार धारणा करत असताना आपण किती त्यांना सहकार्य करतोय ...? हा हि एक प्रश्नच आहे .....कार्यक्रमाच आयोजन सुरु असताना तयारी सुरु होतीच ...बरोबर वेळ धावू लागली ...५ ते ५.१५ ला कार्यक्रम सुरु होण्याची वेळ घरातून कलाकार निघाले ....४.५५ पर्यंत फक्त ५ ते ७ महिला hall मध्ये बसल्या होत्या ...हृदयाचे ठोके ...वाढू लागले ...कोण येणार कि नाही हा प्रश्न ? त्याच बरोबर स्वताला सावरले ...हा कार्यक्रम कोणासाठी नाही आहे... हा माझ्या आईसाठी मग, काहीच टेन्शन नाही ...एक दम शांत मुद्रेत hall बाहेर जाऊन उभा राहिलो आणि येणाऱ्या प्रेक्षकांना ..नमस्ते , नमस्ते ..नमस्ते करायला सुरुवात केली ...मग, शाळेत शिकणारा मुलगा पाल्य असेल ...महिला असतील आणि वयस्कर महिला असतील ....आणि हे स्वागत करणे ...शिक्षक आणि त्या प्रेक्षकांना नवीन ताजगी देत होत ....एक सुंदर वातवरण निर्मिती त्यातून होऊ लागली ....कलाकार आले ...आणि मी आयोजनामध्ये थोडा दंगच राहिलो .
कलाकारांच स्वागत केलं ...मग , प्रेक्षक कोण आहेत यांच्या बद्दल सांगितलं ....त्याचं बरोबर मी शाळेच्या पटांगनामध्ये पाहिलं तर ताजगी फिरत होती ....त्याचं बरोबर प्रेक्षक आत मधून येण्यास सुरुवात झाली होती ... म्हणजे इकडे मी पाहत होतो ...आमचे कालाकार आले त्याचं बरोबर प्रेक्षक हि येऊन बसले होते १०० प्रेक्षक बसणार त्या ठिकाणी जवळ ..जवळ ३५० महिला प्रेक्षक बसल्या होत्या ...वाह ..क्या
बात ....है ? ...लहान विद्यार्थी ...त्याच बरोबर त्याचे पालक ....दूसऱ्या बाजूला महिला ...असं ...संपूर्ण सभागृह भरलं .. “ मैं औरत हूँ ” मंजुल भारद्वाज लिखित नाटकाची सुरुवात झाली आवाज करत असणारी मुले शांत झाली ....महिला शांत झाल्या ...अचानक वातावरनामध्ये शांतता पसरली कलाकारांनी वेळेला हातात पकडून ठेवलय हे जाणवू लागले मी शांत पणे जाऊन सर्वात मागे उभा राहिलो ...
८० % महिला हुंदके देऊन रडताना पाहिल्या ..डोळे पाणावलेले तरीही घट्ट मुठी आवळून ते सादरीकरण पाहत होत्या ...टाळ्यांचा आवाज त्या विदर्भ विद्या मंदीर शाळेच्या आवारात गुंजू लागला ....अश्रूंनी गहिवरलेल्या महिला जाणवू लागल्या स्वताला त्या मंचावर पाहत आहेत ...स्वतःची कहाणी ऐकत आहेत ....२० मिनिटे स्वतःचा शोध सुरु झाला .....नाटक संपल्यावर त्या गहिवरलेल्या डोळ्यांना पाहून मनाला वाटले तुषार सार्थक झाले ...कार्यक्रम त्याचे आयोजन आणि त्याची दखल तुला मिळाली ...आम्ही शोधतोय सावित्री


..माझ्या मध्ये असणारी ...आणि मी शोधतोय हि सावित्री जी समजामध्ये आहे ती माझ्या डोळ्यासमोर असणारी ....या कार्यक्रमाला आलेल्या राजनेत्या आमदार , माजी नगरसेवक ..एकदम गहिवरून गेल्या होत्या ....न बोलणारया महिला आज बोलू लागल्या ..या नाटकामधून प्रेरणा मिळाली ...हे माझ्या डोळ्यांना दिसू लागले होते ...या कलाकृतीच सादरीकरण ....अंतरराष्ट्रीय कलाकार अश्विनी नांदेडकर आणि सायली पावसकर राष्ट्रीय कलाकार कोमल खामकर ....यांनी केलं ...



थियेटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांताने मला उन्मुक्त केलं ...एका बाजूला महिलांनचा आदर कधी मी केला नव्हता ..आणि आता तीन वर्ष थियेटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांताने मला हि दृष्टि दिली कि मी महिलांचा आदर करतोय ..आणि त्यांच्या पितृसत्तात्मक विचारांपासूनच्या मुक्ती साठी मी कार्य करतोय ... आणि हाच माझ्या असण्याचा अर्थ मला या प्रयोगाच्या आयोजनातून जाणवला ......
--------------------------------
थियेटर ऑफ रेलेवंस रंगकर्मी – तुषार राजेश्री तानाजी म्हस्के

1 comment: