Monday 25 January 2016

एक प्रवास अध्यात्मिक अनुभवाचा .....



अनहद नाद म्हणजे माझ्या अंतर्मनातील नाद .....
आज दिनांक २२ जानेवारी रात्रौ ८.३० वा. शिवाजी नाट्य मंदिर दादर, मुंबई . मंजुळ भारद्वाज यांच लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या अनहद नाद नाटकाची प्रस्तुती ....


आज मी पाहतो तर माझ्या जीवनाची हि यात्रा मला आज समाधानाचा श्वास घेण्यासाठी उस्फुर्त करणारी  .....
आता पर्यंत विद्रोहाच्या मनस्थिती मध्ये जगणारी माझी मनोवस्था आज एकदम शांत मुद्रेत मला दिसू लागली . मनाला सुख आणि समाधान मिळण्यासाठी तत्वांचा विस्तार होणं खूप गरजेचं असतं. आज ते तत्व मी माझ्या व्यवहारिक जीवनात रुजवण्यास सुरुवात केली आहे.


आज प्रत्येक कलाकार एकमेकांचे vibrations समजून घेत, एकमेकांना आपल्या नादात सामावून घेऊन, त्यांचा स्वतःचा नाद ऐकत होते. रिहर्सल ला सार्वजण भेटलो आणि पाहिलं तर, प्रत्येक कलाकार एक तेजोमय प्रकाशाचा झोत आणि त्याची यात्रा घेऊन फिरत आहे ....
अनहद नाद च्या show अगोदर झालेल्या ३ दिवसीय कार्य शाळेत विचारांचं मंथन करून निघालेले कलाकार आज त्या काजव्यांसारखे चमकत होते .... एक सुंदर अशी यात्रा.... हवी हवीशी वाटणारी ,मनात तेज निर्माण करणारी , मनाला शांतता  देणारी, माझी मला वाटू लागली.

आज शब्द हि खेळू लागले.... अगदि सहजतेने कालाकारांच्या वाणीतून झळकू लागले... रोमारोमात संचार करणारे शब्द आज शिवाजी मंदिरात घुमू लागले ....आज कोणाला दाखवायचा म्हणून performance नव्हता . आज स्वतःसाठी आम्ही perform करत होतो .

रिहर्सल करून आल्यानंतर आम्ही लगेच तयार होऊन रंगमंचावर रंगमंचाशी connect होण्यासाठी आलो .... अगदी सहजपणे.... माझी जबाबदारी मला माहिती असल्यामुळे रंगमंचावर बाहेर आलेले खिळे हातोडीने आत ठोकण्यास सुरुवात केली .... लगेच माझ्या बरोबर असणारे कलाकार हि कामाला लागले . शिवाजी नाट्य मंदिर च्या रंगमचावर पाहिल्यानंतर मनाला खूप चिंता आणि भीती वाटते .... एक सच्चा कलाकार रंगमंचाला आपली कर्म भूमी, आपली माता समजतो त्याच रंगमंचावर पाहिल्यानंतर तिथे कुठे खिळे वर आलेले, कुठे सेट चा वापर करून स्वतःला व्यावसायिक नाटककार समजणाऱ्या नाटककारांनी त्या रंगभूमीचा हवा तेवढा वापर करून सोडला आहे ..... कला हि स्वतःमध्ये परिपूर्ण असते .... मग जर प्रत्येक कलाकार स्वतःला कलाकार समजत असेल तर तो अशा पद्धतीने सेट design का नाही करत ज्या मुळे आपण perform करत असणाऱ्या रंगमंचाला काहीच ठोकाठाकी न करता त्यावर performance करता येईल .....? त्या कर्मभूमीला पाहिलं आणि डोळे पाणावलेले ....ती आग मनामध्ये सतत जळत राहते .

आजची अनहद नाद ची प्रस्तुती म्हणजे एक विलक्षण प्रयोग आहे हे सातत्याने जाणवत होते. रंगमंचावर झोपल्यानंतर humming आणि आलाप करण्यास सुरुवात केली आज माझा आवाज हा माझ्या ब्रम्हांडा मध्ये गुंजायमान होताना जाणवू लागला एका सुरामध्ये सूर , एका नादा मध्ये नाद..... अनहद चा प्रत्येक कलाकार एकमेकांच्या नाभी शी झोडलेला आहे आणि ते एकमेकांना अखंड विश्वा मध्ये एकमेकांशी एका चेतनेने बांधालेले आहेत हे दिसू लागले .....आज मी एकदम शांत होतो. मनामध्ये अजिबात ओझं नव्हतं. ना कोणता भाव होता, ना काशाचं दडपण होतं.... आज मी उन्मुक्त पणे performance करत होतो .... 



आज योगिनी विलक्षण तेजामध्ये दिसत होती. एकमेकांचा हात पकडून एकमेकांना उर्जा पास करत होती .... आज अश्विनी एक aura घेऊन फिरत होती .... आज प्रत्येक कलाकार एकमेकांना ऊर्जा पास करत होता .... पहिली बेल वाजली आणि आम्ही कलाकार आपली चेतना जागी करून perfomance करण्यासाठी तयार झालो ....किती महत्वाची गोष्टी असते ना एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला perfomance करण्याअगोदर ऊर्जा पास करतो, आपल्या मध्ये सामावेष्ट करून घेतो आणि आपला रंगकर्म अगदी सहज होऊन जातो ....

आज अध्यात्मिकतेकडे जाणारा performance .....विलक्षण तेजाने नटलेला.... रंगमंचावर प्रवेश करताना एकदम वादळासारखा यायचो आणि सहजतेने perform करायचो आणि पुन्हा विंगेत जायचो. आज ते भाव हे समग्र दृष्टीचे होते. आपल्या व्यावहारिक गोष्टींना एकत्र समजून त्यांच्याबरोबर एक लयाने एकरूप होणे हे विशेष होते .....

नदीच्या सीन ला दगड बनल्यानंतर जाणवत होतं कि नाका तोंडामध्ये पाणी गेलय आणि मी पाण्यातील एक भाग आहे . माझ्या जीवनाची यात्रा हि विचारानुसार बदलणारी …. माझी दृष्टी हि त्यानुसार बदलणारी ....नाटक सुरु असताना आलेली सहजता आणि त्यातून निर्माण झालेली व्यवहारिकता हि एक निपुणता निर्माण करत होती .... त्या क्षणाला वाटू लागले मन आणि शरीर एकत्र perform करत आहेत ....

आज performance झाल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया :

अध्यात्मा चा अनुभव झाला ......त्या क्षणी मी इथे नव्हतोच .... मी तुमच्याबरोबर रंगमंचावर होतो ....
खूप भन्नाट नाटक आहे ....अशा पद्धतीचा नाटक मी पहिल्यांदा पाहिल ..... मी माझा वाढदिवस आज अनहद नाद पाहून इथे साजरा केला त्याच मला समाधान आहे ...संवाद हृदयाशी भिडत होते ....



या अशा लख लखत्या अनुभवांचं तेज घेऊन प्रेक्षक, म्हणजेच TOR नाट्यसिद्धांता मधील पहिला रंगकर्मी, आपल्या जीवनात विचार ,तत्व ,सत्व घेऊन  जीवन जगण्यासाठी , जीवनाला जगण्यासाठी , विचारांना समजण्यासाठी आयुष्याच्या रंगमंचावर जीवन जगण्यासाठी एक प्रेरणा घेऊन निघाला आहे......

तुषार म्हस्के

No comments:

Post a Comment