Thursday, 8 January 2026

मत देताना विचार करा....

 मत देताना विचार करा....

जल ... जंगल ... जमीन 

नैसर्गिक संसाधन यांना स्वार्था साठी वापरायचे आहेत... 

याचे परिणाम काय होतील त्याचा विचार करा... विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संसाधनांवर डल्ला मारणं सुरू आहे... गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्तेच्या केंद्र बिंदू मध्ये असणारे सत्ताधिश जनतेची दिशाभूल करत आहेत... जनतेला भावनिक गोष्टींचा खुराक देऊन सत्तेत यायचं आणि नैसर्गिक संसाधन आणि नैसर्गिक ठेवा ... भांडवल दाराच्या घशात टाकायचा... नक्की हे प्रकरण काय सुरू आहे... ? याचा भारतातील मालकांनी म्हणजेच जनतेने विचार करायला हवा... पण, अर्थात माणसाच्या भावना ह्या शून्य झाल्यात... स्वतःच मत, स्वतःची  भूमिका राहिली नाही... हा निसर्ग आणि पर्यावरण राहिला नाही तर आपण श्वास कसा घेणार ? 

आपला नाहीतर पुढच्या पिढी चा विचार करा... तुम्ही ज्यांना निवडून देता त्यांचा विचार नका करू ... त्यांच्या नावाने विदेशात घर आहेत... जागा आहे... त्यांची मुलं तिकडे शिफ्ट होतील... मात्र आमची मुलं श्वास घेण्यासाठी तरसतील... 

विचार करा ....! 


https://www.esakal.com/vidarbha/tadoba-tiger-reserve-wildlife-corridor-mining-project-approved-despite-opposition-maharashtra-government-spb94?fbclid=IwY2xjawPMt9pleHRuA2FlbQIxMABicmlkETFFUml6TEJGY2t4QnlqNU9Qc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHm_2Ufl4Ws-tspLkVL6WXzv8c4VoOdU_db0LMpRdQlQzTG_bJjkhzZxuVZ32_aem_VzjWPJEBtY8wOE9qwinPxg

तुषार म्हस्के 

प्रेक्षक संवादाच्या माध्यमातून आम्ही थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताचे रंगकर्मी...

आज , दादर मध्ये 

मुंबई सर्वसामान्य माणसांची...आज दादर मध्ये चालत असताना आठवणी जाग्या झाल्या... श्री शिवाजी मंदिर,  मध्ये पाय ठेवल्यावर संपूर्ण 2015 पासूनचा इतिहास आठवला... मंजुल भारद्वाज रचित नाटक "  अनहद नाद - Unheard Sounds of Universe" या नाटकाने रंगभूमीची दिशा बदलली... तो प्रवास होता.. रंगभूमीला घडवण्याचा... रंगभूमीला  घडवण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे  प्रेक्षक... 

प्रेक्षक संवादाच्या माध्यमातून आम्ही थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताचे रंगकर्मी... शोध घेत निघालो प्रेक्षकांचा... अगदी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलो... एक - एक व्यक्तीला भेटत संवाद करत आम्ही लोकांमध्ये नाटकाविषयी आदर, जबाबदारी, प्रेम, जाणीव निर्माण केली... त्या छोट्याशा रोपट्याचे आज वट वृक्षामध्ये रूपांतर झालेले आम्ही अनुभवत आहे... सर्व सामान्य माणूस नाटकाकडे पुन्हा वळत आहे... तो आवर्जून विचारतो...  " यावेळी, तुमचं कोणतं नाटक आहे... ! " आम्हाला पहायचं आहे... आम्ही नाटक पहायला येणार आहे... 

यावेळी, आम्ही मंजुल भारद्वाज रचित नाटक द... अदर वर्ल्ड ची  प्रस्तुती श्री शिवाजी मंदिर येथे करणार आहोत... येत्या 24 जानेवारी 2026, सकाळी 11.00 वाजता...

आम्ही आता मुंबई मध्ये प्रेक्षक संवादासाठी सज्ज आहोत... भेटुयात, बोलुयात, संवाद  साधूयात ... माणसाच्या आतील निसर्ग जागृत करुयात... माणसाच्या मेंदूत एक झाड लावुयात...

हम हैं !




रंगकर्मी
तुषार म्हस्के