Saturday 20 January 2018

" थियेटर ऑफ रेलेवंस राजनैतिक चिंतन रैली "

आता पर्यंत आपण राजनीति ला खूप शिव्या देतो . राजनीती घाणेरडी आहे, गटार आहे, राजनीती मध्ये असणारे व्यक्ती वाईट असतात .... अशा अनेक वाईट उपमा देऊन आपण सभ्य माणसे राजनीति पासून लांब राहतो. राजनीति ला सांभाळणारे "व्यक्ती " वाईट असू शकतात. पण, राजनीति वाईट असू शकत नाही.माणसाच्या जीवनातील सर्व घटना ह्या राजनीति वर अवलंबून आहेत. एका बाजूला राजनीति ला बदनाम करण्याच षड्यंत्र सुरु असताना. दुसऱ्या बाजूला "थियेटर ऑफ रेलेवंस " नाट्य सिद्धांताने राजनीति ची सात्विक व्याख्या जनतेच्या उद्धारासाठी जनमाणसात आणली. " सध्या लोकशाही ला टिकवून ठेवणे हे सर्वात मोठे आवाहन झाले आहे. त्यातच लोकशाही ला सांभाळणारा " भारताचा नागरिक " सभ्यतेची चादर पांघरून बसला आहे. वेळ आली आहे. राजनीति ला समजून घेण्याची ..राजनीती ची व्यापकता जनमाणसात पोहचवण्याची...आवाहन आहे ...लोकशाही ला सांभाळणाऱ्या शिलेदारांना आणि लोकशाहीचे पालन करणार्यांना चला " एकत्र येवूयात " गल्ली पासून चा आवाज दिल्ली पर्यंत पोहोचवूयात...


" थियेटर ऑफ रेलेवंस राजनैतिक चिंतन रैली " दिनांक - 21 जानेवारी 2018, रोजी सकाळी 7:30 वाजता. आप्पा पाडा रिक्षा स्थानक ते मालाड रेल्वे स्थानक पूर्व पर्यंत असणार आहे.

* येणारा व्यक्ती हा रंग, जात , धर्म , कोणताही राजकीय पक्ष यांच्यापलीकडे एक " भारताचा जबाबदार नागरिक " म्हणून येईल हि अपेक्षा...

* " थिएटर ऑफ रेलेवन्स राजनैतिक चिंतन रैली " काढण्याचा उद्देश जनमाणसापर्यंत " राजनीति " ची शुद्ध आणि सात्विक बाजू पोहचवणे. ज्यामुळे राजनीति प्रति आदर निर्माण होईल . त्यातून सामान्य व्यक्ती ची राजनीती बरोबर सहभाग नोंदवेल.

* अति महत्वाची गोष्ट - आपण कोणताही व्यक्ती , राजकीय पक्ष , धर्म ,जात , रंग ह्या अतिसंवेदनशील गोष्टींच्या विरोधात बोलणार नाही.

* ह्या रैली च वैशिष्ट्य - एक व्यक्ती राजनीति ची व्याख्या बोलेल त्याच्या मागे आपल्याला बोलायचं आहे .

* मध्ये मध्ये - फक्त "हम हैं " चा नारा असेल ..

* आप्पा पाडा रिक्षा स्थानक-जिजामाता शाळा-रमेश हॉटेल-स्टेट बँक-संस्कार कॉलेज-कुरार पोलीस चौकी-हायवे सबवे-दफ़्तरी रोड-शिवाजी चौक-मालाड रेल्वे स्थानक* असा असणार आहे.

* सहभागी - सर्व भारतीय जे स्वतःला लोकशाहीचे शिलेदार आणि पालनकर्ता समजतात.

तुषार म्हस्के
9029333147

No comments:

Post a Comment